पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल, 2 वर्षातच मिळणार जबरदस्त रिटर्न

अलीकडे बँकांनी एफडीच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

आरबीआयने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची आणि या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला यामध्ये आणखी 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली.

दरम्यान आरबीआयच्या या कपाती नंतर देशातील विविध बँकांनी होम लोनसह सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात कपात केली आहे. एवढेच नाही तर फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली आहे.

मात्र असे असले तरी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर अजूनही कायम आहेत. यामुळे चांगल्या रिटर्न साठी पोस्ट ऑफिस चा पर्याय बेस्ट ठरणार आहे. पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार आहे.

कशी आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना 

पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना म्हणजेच एफ डी योजना एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. यातील एक वर्ष एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.9% दराने,

दोन वर्षे एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सात टक्के दराने, तीन वर्षे एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्षे एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% दराने परतावा मिळतोय.

दरम्यान आता आपण पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या एफ डी योजनेबाबतची माहिती पाहणार आहोत. दोन वर्षांच्या एफडी योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन आता आपण जाणून घेऊया.

पाच लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार इतके रिटर्न 

पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या टाईम डिपॉसिटी योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केल्यास सध्याच्या सात टक्के दराने गुंतवणूकदारांना पाच लाख 74 हजार 441 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 74 हजार 441 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.

महत्त्वाची बाब म्हणजे याच दोन वर्षांच्या एफडी योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने दहा लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना सात टक्के दराने 11 लाख 48 हजार 882 मिळणार आहे. म्हणजे दोन वर्षात एक लाख 48,882 रिटर्न मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe