PPF Scheme : शेअर मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. शेअर मार्केट कमालीचा दबावात आहे. यामुळे अनेक जण आता सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. दरम्यान जर तुम्हालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच खास राहणार आहे.
आज आपण भारतातील एका सुरक्षित गुंतवणूक योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे संपूर्ण स्वरूप आणि या योजनेत एक लाखाची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांनी किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आज आपण समजून घेणार आहोत.

कशी आहे पीपीएफ योजना ?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी गुंतवणुकीची योजना आहे. या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या वार्षिक 7.10% दराने परतावा दिला जात आहे. या योजनेत वार्षिक किमान पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
तसेच जास्तीत जास्त वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येऊ शकते. म्हणजेच या योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. पीपीएफ अकाउंट हे 15 वर्षात परिपक्व होत असले तरी देखील पंधरा वर्षांनी या योजनेचा कालावधी पाच-पाच वर्षांनी वाढवला जाऊ शकतो.
या योजनेचा कालावधी पाच-पाच वर्षांनी वाढवून गुंतवणूकदार पन्नास वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. आता आपण या योजनेत वार्षिक एक लाख रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास पंधरा वर्षांनी किती रिटर्न मिळणार याचेच कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ योजनेत दरवर्षी एक लाख रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर मॅच्युरिटी वर त्याला वार्षिक 7.10% दराने 27 लाख 12,139 रुपये मिळणार आहेत यामध्ये संबंधित गुंतवणूकदाराचे गुंतवणूक ही 15 लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित 12,12,139 रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना असून यामध्ये गुंतवलेला पैसा कधीच वाया जात नाही. शिवाय यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारकडून चांगला परतावा सुद्धा मिळतोय. जर तुम्हाला शासनाच्या या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेत अकाउंट ओपन करू शकता.
किंवा मग तुम्हाला बँकेतही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही बँकेत जाऊन पीपीएफ अकाउंट ओपन करू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.