Pre-Winter Trip: थंडी सुरू होण्याअगोदर मस्तपैकी कुटुंबासोबत बनवा ट्रीप प्लान! भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट; सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

गुलाबी थंडी सुरू होण्याच्या अगोदर म्हणजेच प्री विंटर व्हेकेशन प्लान करायचे असेल तर तुम्ही भारतातील महत्त्वाच्या असलेल्या या डेस्टिनेशनला भेट देऊ शकतात व तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवू शकतात.

Published on -

Pre-Winter Trip:- भारताला निसर्गाने खूप मोठ्या प्रमाणावर सढळ हाताने भरभरून दिले असून तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये जाल तरी तुम्हाला अनेक निसर्गसमृद्ध अशी पर्यटन स्थळे बघायला मिळतात. त्यामुळे कुठल्याही हंगामामध्ये तुम्ही ट्रीप प्लान केली तरी तुम्हाला भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अशा पर्यटन स्थळांना भेट देता येणे शक्य होते.

पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तर अशा प्रकारच्या निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांचे रूप आणखीनच खुलून दिसते व मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची पावले अशा स्थळांच्या दिशेने चालायला लागतात. त्यासोबतच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून देखील अनेक पर्यटन स्थळे भारतात असून त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने दरवर्षी पर्यटक हजेरी लावत असतात.

अगदी या अनुषंगाने बघितले तर आता ऑक्टोबर महिना संपत आला असून लवकरच आता थंडीचा कालावधी म्हणजेच हिवाळ्याची सुरुवात होणार आहे.

त्यामुळे तुम्हाला देखील गुलाबी थंडी सुरू होण्याच्या अगोदर म्हणजेच प्री विंटर व्हेकेशन प्लान करायचे असेल तर तुम्ही भारतातील महत्त्वाच्या असलेल्या या डेस्टिनेशनला भेट देऊ शकतात व तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवू शकतात. हिवाळा सुरू होण्याअगोदर जर तुमचे सुट्टीचे नियोजन असेल तर तुम्ही देशातील या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

 हिवाळ्या अगोदर ट्रीप प्लान करा आणि या ठिकाणांना भेट द्या

1- ऋषिकेश ऋषिकेश हे उत्तराखंड राज्यात असून गंगा नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र शहर म्हणून ओळखले जाते. ऋषिकेशला जगाची योग राजधानी म्हणून देखील ओळखले जाते व या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत.

तसेच निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे देखील ऋषिकेशला असून तुम्ही एकाच वेळी धार्मिक पर्यटनासोबत नैसर्गिक पर्यटनाचा देखील आनंद घेऊ शकतात.

2- वागमोन तुम्हाला जर तुमची ट्रीप हिरवाई आणि निसर्ग सौंदर्यामध्ये व्यतीत करायची असेल तर केरळ मधील वागमोन हे ठिकाण तुमच्यासाठी खूप योग्य पर्याय ठरेल.

वागमोन हे त्रावणकोर मधील  छोटीशी वस्ती असून चहाच्या मळ्यांनी वेढलेली असल्याने या ठिकाणचे सौंदर्य खूपच मनमोहक असे आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यान कोपऱ्यात निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते व हिवाळा पूर्वीच्या ट्रीप साठी हे ठिकाण तुम्ही निवडू शकता.

3- बांधवगड राष्ट्रीय उद्यान तुम्हाला जर निसर्ग सौंदर्यासोबतच वन्यजीव निरीक्षणाची आवड असेल तर तुमच्याकरिता मध्यप्रदेश राज्यातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान हा योग्य पर्याय ठरेल.

बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे बंगाल टायगरसाठी आणि जैवविविधता या दृष्टिकोनातून खूपच प्रसिद्ध असून ऑक्टोबर महिन्यामध्ये भेट देण्याकरिता हे भारतातील सर्वात्तम ठिकाणांपैकी एक आहे.

4- हम्पी हम्पी हे ठिकाण कर्नाटक राज्यात असून एका काळी हे सर्वात श्रीमंत शहर मानले जायचे. तुम्हाला जर निसर्ग सौंदर्या सोबतच इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हम्पी या ठिकाणाला ऑक्टोबर महिन्यात भेट देऊ शकतात कारण ऑक्टोबर महिन्यात भेट देण्यासाठी हे एक चांगला पर्याय आहे.

हम्पी शहर म्हटले म्हणजे हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहेच परंतु या ठिकाणची मंदिरे आणि अप्रतिम अशी भव्य वास्तूकला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.

5- गोकर्ण तुम्हाला जर समुद्रकिनाऱ्याचे दृश्य अनुभवायचे असेल व त्या ठिकाणी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांच्या सानिध्यात निवांतपणा अनुभवाचा असेल तर तुमच्या करिता कर्नाटक राज्यातील गोकर्ण हे ठिकाण एक चांगला पर्याय आहे.

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत भेट देण्यासाठी गोकर्ण उत्तम पर्याय असून या ठिकाणी तुम्हाला अधिक शांतता आणि निवांतपणा अनुभवता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!