Property Rights : भारतात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. अनेकदा संपत्तीवरून होणारे वाद-विवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरण न्यायालयात येतात. खरे तर भारतात संपत्ती विषयक कायदे अस्तित्वात आहेत मात्र कायद्यातील सर्वच तरतुदी सर्वसामान्यांना समजत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठा गैरसमज तयार होतो.
हेच कारण आहे की आज आपण संपत्तीविषयक कायद्यामधील एका महत्त्वाच्या बागेची माहिती पाहणार आहोत. जसे की आपणास ठाऊकच आहे की भारतीय कायद्याने वडिलांच्या मालमत्तेत मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेला आहे.

मात्र कायद्याने मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिलेला असल्याने जावयाला देखील त्याच्या सासरच्या संपत्तीत काही अधिकार मिळतो का असा प्रश्न उपस्थित होतोय. आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कायदा काय सांगतो?
हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 ज्याला Hindu Succession Act – HSA म्हणून ओळखले जाते या कायद्यानुसार, सासरच्या संपत्तीत जावयाला अधिकार मिळू शकत नाही. खरे तर या कायद्यात वारसा हक्कासाठी वर्ग-1 उत्तराधिकारींची यादी सुद्धा आहे.
या यादीनुसार पत्नी, मुलगा, मुलगी, मृत मुलाचा मुलगा किंवा मुलगी, मृत मुलाची पत्नी व त्यांच्या संततीचा वर्ग एक वारसदारांमध्ये समावेश होतो. मात्र, मुलीचा पती – म्हणजेच जावई – या यादीत येत नाही.
म्हणजेच मुलीच्या लग्नानंतर सुद्धा तिला आपल्या वडिलांच्या संपत्ती पूर्ण अधिकार मिळतो पण तिचा पती त्याच्या सासरच्या संपत्तीत आपोआप हक्कदार होऊ शकत नाही. दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने जावयाला सासरच्या संपत्तीत अधिकार मिळतो की नाही या संदर्भातील एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.
हायकोर्टाचे म्हणणे काय?
केरळ उच्च न्यायालयात एक असेच प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात जावयाने सासरच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी स्वतः पैसे खर्च केले होते. यामुळे जावई त्या घरावर दावा ठोकत होता.
मात्र माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना जावयाला त्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क प्राप्त होत नाही असे सांगत जावयाची याचिका फेटाळून लावली होती.
जावई हा केवळ सासऱ्यांच्या परवानगीने त्यांच्या घरात राहू शकतो आणि जर ती परवानगी सासरच्या लोकांनी मागे घेतली तर त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकारही उरत नाही, असे माननीय केरळ हायकोर्टाने स्पष्ट केले होते.