बातमी कामाची ! मुलांच्या अन मुलींच्या मालमत्तेवर आई-वडिलांचा हक्क असतो का ? कायदा काय सांगतो ? वाचा….

आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांना जेवढा अधिकार असतो तेवढाच मुलींना देखील अधिकार देण्यात आला आहे. जवळपास सर्वच लोकांना भारतीय कायद्यातील या तरतुदीची माहिती आहे. मात्र, अनेकांच्या माध्यमातून आई-वडिलांना आपल्या मुलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Published on -

Property Rights : भारतात संपत्ती विषयक वादविवादाची अनेक प्रकरणे आपण पाहतो. संपत्तीवरून काही कुटुंबात नेहमीच वादविवाद पाहायला मिळतो. खरंतर भारतात कायद्यानुसार आई वडिलांच्या संपत्तीत मुला मुलींना अधिकार देण्यात आले आहेत. आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांना जेवढा अधिकार असतो तेवढाच मुलींना देखील अधिकार देण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे अविवाहित मुलींप्रमाणेचं विवाहित मुलींना देखील आई-वडिलांच्या संपत्तीत अधिकार देण्यात आला आहे. जवळपास सर्वच लोकांना भारतीय कायद्यातील या तरतुदीची माहिती आहे. मात्र, अनेकांच्या माध्यमातून आई-वडिलांना आपल्या मुलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मुलाच्या तसेच मुलीच्या संपत्तीत आई-वडिलांचा अधिकार असतो का? याबाबत तज्ञ लोकांनी मोठी माहिती दिली आहे. दरम्यान आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुलाच्या आणि मुलीच्या संपत्तीत आई वडिलांचा अधिकार असतो का?

मुलाच्या आणि मुलीच्या संपत्तीत त्यांच्या आई-वडिलांना अधिकार असतो का याबाबत भारतीय कायद्यात महत्त्वाची तरतूद करून देण्यात आली आहे. कायद्यानुसार, काही विशिष्ट परिस्थितीत मुलाच्या आणि मुलीच्या संपत्तीत आई-वडिलांना अधिकार मिळतो.

याबाबत भारतीय उत्तराधिकारी कायद्यात तरतूद आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा, 2005 मधील कलम 8 नुसार पालकांना मुलाच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार दिला जातो. खरेतर, पालकांना आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या संपत्तीत संपूर्ण अधिकार देण्यात आलेला नाही.

पालकांना त्यांच्या मुलांच्या संपत्ती थेट अधिकार नसतो पण काही विशिष्ट परिस्थितीत संपत्तीत अधिकार दिला गेला आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा अविवाहित असताना मृत्यू झाला आणि मृत्यूपत्र लिहिले नसेल, तर पालकांना त्याच्या संपत्तीवर अधिकार मिळतो.

अपघात किंवा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्यास, पालकांना त्यांच्या मुलाच्या मालमत्तेवर दावा करता येतो. पण पालक दोघेही हयात असतील, म्हणजेच आई आणि वडील दोघेही हयात असतील तर अशा परिस्थितीत आईला पहिला हक्क मिळतो आणि वडिलांना दुसरा हक्क दिला जातो.

पण जर समजा एखाद्या प्रकरणात आई हयात नसेल, तर वडिलांना मालमत्तेवर हक्क मिळतो. अशा प्रकरणांमध्ये वडील आणि इतर कुटुंबीयांमध्ये मालमत्ता विभागली जाते. पण, वारसदारांची संख्या जास्त असल्यास, वडील आणि इतर वारस समान भागीदार मानले जातात.

जर समजा मुलगा अविवाहित असेल आणि मृत्युपत्र अर्थातच इच्छापत्र न बनवता त्याचा मृत्यू झाला असेल तर आई पहिली वारस बनते तर वडील दुसरे वारस बनतात. मुलगा विवाहित असल्यास त्याच्या पत्नीचा पहिला हक्क राहतो तर दुसरा हक्क पालकांचा असतो.

मुलगी अविवाहित असल्यास तिच्या संपत्तीचा हक्क पालकांकडे जातो. मुलगी विवाहित असल्यास त्याच्या मुलांना आणि तिच्या पतीला तिच्या संपत्तीचा अधिकार मिळतो. मुलीला जर अपत्य नसेल तर अशा प्रकरणांमध्ये तिच्या पतीला पहिला हक्क मिळतो आणि तिच्या पालकांना दुसरा हक्क मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News