पुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ‘या’ गावात लवकरच होणार भु-संपादन

Published on -

Pune-Aurangabad Expressway News : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. हा महामार्ग NHI कडून जरी बनवला जात असला तरी देखील यासाठी आवश्यक भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.

दरम्यान यासाठी रस्ते विकास महामंडळाने विधानभवनात एका स्वातंत्र्य कक्षाची स्थापना केली आहे. यामुळे लवकरच महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती दिली जात आहे.

दरम्यान आज आपण हा दहा हजार कोटी रुपये खर्च करून बांधला जाणारा सहा पदरी महामार्ग कोणत्या गावातून जाणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 

अहमदनगर जिल्ह्यातील या गावातून जाणार हा महामार्ग 

श्रीगोंदा तालुका :- हिंगणी, देवदैठण (ढवळे वस्ती)

पारनेर तालुका :- पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डे, बाबुर्डी, रुई छत्रपती, पिपरी गवळी, रायतळे, अस्तगांव, सारोळा कासार

नगर तालुका :- बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातोडी पारगाव, मराठवाडी, दगडवाडी

पाथर्डी तालुका :- देवराई, शिरापूर, तिसगाव, निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसारे

शेवगाव :- मुर्शदपूर, हासनापूर, वारखेड, चापडगाव, प्रभू वडगाव.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील या गावातून जाणार हा महामार्ग :-

पैठण तालुका :- खडके, मडके, साईगाव, दादेगाव जहागीर, पानठेवाडी, कांजरखेडा, वरुडी बुद्रुक, वावा, वडाळा, डोणगाव (पैठण), पोरगाव तांडा, वरवंडी खुर्द, घरडोण, आडगाव, झाल्टा, सुंदरवाडी, रामपूर, मल्हारपूर.

 

पुणे जिल्ह्यातील या गावातून जाणारा महामार्ग 

पुरंदर तालुका :- खेड – शिवापूर येथून स्टार्ट होऊन – शिवरे, गराडे, चांभळी, पवारवाडी, सासवड

हवेली तालुका :- वळती, उरळी कांचन, कोरेगाव मूळ

शिरूर :- हिंगणवाडी, देवकरवाडी, पानवली, आंबळे, कर्डे, गोलेगाव.

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडोर : 268 किलोमीटर लांबी, 10,080 कोटींचा खर्च ; असा राहणार हा मार्ग, सुपा MIDC ला येणार अच्छे दिन !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe