प्रतीक्षा संपली, श्री-गणेशा झालाचं ! पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या बांधकामाला सुरुवात ; नितीन गडकरींनी केलं होत भूमिपूजन

Ajay Patil
Published:
pune bangalore highway

Pune Bangalore Highway : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या महामार्गांचे कामे सुरू आहेत. अशातच आता पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता या आशियाई महामार्गातील शेंद्रे ते कागल नाका या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे 25 डिसेंबर 2021 रोजी या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून या महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केव्हा होईल याबाबत नागरिकांना उत्सुकता लागून होती. आता या सहा पदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम वाळवा तालुक्यात पेठनाका ते कासेगावदरम्यान सुरु झालं आहे.

या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली लहान-मोठी झाडे तोडण्याचे सध्या काम सुरू आहे. तसेच पेठनाका येथील पुलाच्या भरावाचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे. पाणी जाण्यासाठी असलेल्या पुलाच्या ठिकाणी सिमेंट पाइप टाकून बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कासेगाव येथे रस्त्यास अडथळा ठरणाऱ्या सुमारे ४० घरांचे बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच महामार्ग लगत असलेल्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. संबंधित रहिवाशांना त्याबाबत सूचना देण्यात आली असून संबंधित बाधित नुकसानभरपाईबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व ग्रामपंचायत पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

खरं पाहता या महामार्गावर वाळवा तालुक्याच्या हद्दीतील येवलेवाडी फाटा, नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी फाटा, वाघवाडी फाटा, कामेरी, येलूर या ठिकाणी कायमच अपघात होत असतात. या पार्श्वभूमीवर या अपघातप्रवण क्षेत्रात उड्डाणपूल बांधण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र महामार्गावरील कासेगाव व पेठ या ठिकाणी असलेले उड्डाणपूल तसेच राहणार आहेत.

दरम्यान शेंद्रे ते कागल हे सहा पदरीकरणाचे काम एकूण दोन टप्प्यात पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात कागल ते पेठनाका असं सहा पदरीकरणाचा काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात पेठ नाका ते शेंद्रे सातारा असं काम होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही टप्प्यासाठी दोन स्पेशल कंपन्यांना काम देण्यात आल आहे.

शेंद्रे ते कागल असे एकूण 133 किलोमीटरचं हे काम दोन टप्प्यात विभागलं गेलं असल्याने लवकरात लवकर काम पूर्णत्वास येईल असा विश्वास जाणकार लोकांनी वर्तवला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पेठनाका ते शेंद्रे या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तसेच कागल ते पेठनाका या महिन्यात सुरु केल जाणार असून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे टारगेट शासनाने ठेवले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe