पुणे, कोल्हापूर, सोलापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वे 1 जुलै पासून सुरू करणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसे असणार रूट ?

पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात मध्य रेल्वे कडून तीन नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Pune Kolhapur Railway : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा लागणार आहे. आषाढी वारीसाठी देशभरातील कानाकोपऱ्यातील वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करत असतात.

आषाढी एकादशीला अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. यामुळे या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. शिवाय प्रवाशांकडून या काळात ज्यादा गाड्यांची सुद्धा मागणी केली जाते.

दरम्यान याच मागणीच्या अनुषंगाने सेंट्रल रेल्वे कडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. पुणे – पंढरपूर – मिरज, कोल्हापूर – पंढरपूर – कुर्डूवाडी आणि मिरज ते कलबुर्गी यादरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे.

या गाड्यांमुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या तिन्ही विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

पुणे – पंढरपूर – मिरज विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे – पंढरपूर – मिरज विशेष एक्सप्रेस ट्रेन 3 जुलै ते सात जुलै 2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दररोज चालवली जाईल.

यातील गाडी क्रमांक 01207 पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे, पुढे ही गाडी दुपारी चार वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल आणि मिरज रेल्वे स्थानकावर सायंकाळी पावणे सात वाजता पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01208 मिरज रेल्वे स्थानकावरून सायंकाळी साडेसात वाजता सोडली जाणार आहे, ही ट्रेन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रात्री दहा वाजता आणि पहाटे साडेचार वाजता पुण्यात येणार आहे.  

कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डूवाडी विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे असेल?

रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, कोल्हापूर – पंढरपूर – कुर्डूवाडी विशेष एक्सप्रेस ट्रेन एक जुलै ते 10 जुलै 2025 दरम्यान चालवण्यात येणार आहे. या काळात ही गाडी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी सहा वाजून दहा वाजता सोडली जाईल, पुढे पंढरपूर येथे दुपारी सव्वा बारा वाजता पोहोचणार आहे आणि दुपारी दीड वाजता कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरून दुपारी चार वाजून 40 मिनिटांनी सोडली जाईल, पुढे पंढरपूर येथे ही गाडी पाच वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल आणि कोल्हापुरात रात्री साडेदहा वाजता पोहोचणार आहे.

मिरज-कलबुर्गी विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे असणार ? 

मिरज-कलबुर्गी विशेष एक्सप्रेस ट्रेन एक जुलै ते 10 जुलै दरम्यान चालवले जाणार आहे. या काळात ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावरून सकाळी पाच वाजता सोडली जाईल, पंढरपूर येथे सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल आणि कलबुर्गी येथे दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी कलबुर्गीहुन दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाईल, पुढे पंढरपूर येथे रात्री 8:55 मिनिटांनी ही गाडी पोहोचला आणि मिरज रेल्वे स्थानकावर या गाडीचे आगमन रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!