पुण्यातील ‘या’ मार्गावर लोकल सुरू करण्यास रेल्वे बोर्डाचा नकार ! दोन वर्षांपासून भिजत पडलेला प्रस्ताव फेटाळला, आता पुढे काय?

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे बोर्डाकडून पुणेकरांसाठी महत्त्वाच्या अशा एका प्रस्तावाला नकारघंटा दाखवण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे.

Published on -

Pune Local News : पुणेकरांसाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या स्थितीला पुणे ते लोणावळा या मार्गांवर लोकल ट्रेन सुरु आहे. महत्वाचे म्हणजे या मार्गावरील लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तर दुसरीकडे पुणे ते दौंड या मार्गावर लोकल ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी आहे.

यासाठी पुणे ते दौंडदरम्यान धावणाऱ्या डेमू गाड्यांचे उपनगरीय लोकल सेवेत रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र आता रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळला असून पुणे दौंड लोकल सेवेचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले आहे.

यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अलीकडेच रेल्वे बोर्डाने दौंड स्थानकाला उपनगरचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

दोन वर्षांपूर्वी सादर केला होता प्रस्ताव 

खरेतर, पुणे रेल्वे प्रशासनाने दौंडला उपनगरीय दर्जा मिळावा यासाठी दोन वर्षांपूर्वीच प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे दौंडला उपनगरीय दर्जा मिळणार असे वाटतं होते. महत्वाची बाब म्हणजे तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

मात्र, आता रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळला आहे, कोणतेही समाधानकारक उत्तर न देता हा प्रस्ताव बोर्डाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील निर्णयासाठी राज्य सरकारच्या भूमिकेवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

सुमारे 40,000 प्रवासी प्रवास करतात

पुणे-दौंड दरम्यान सध्या डेमु सुरु आहे आणि यावर दररोज सुमारे 40,000 प्रवासी प्रवास करतात. यामुळे या मार्गावर लोकल सेवा सुरू झाली पाहिजे अशी प्रवाशांची मागणी आहे आणि जर या मार्गावर लोकल सेवा सुरू झाली तर प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे.

खरेतर पुणे रेल्वे विभागाने या दिशेने काही सकारात्मक पावलेही उचलली होती. या मार्गावर लोकल सुरू व्हावी यासाठी फलाटांची उंची लोकलच्या फूटबोर्डशी सुसंगत ठेवणे, प्लॅटफॉर्म आणि डब्यांमधील अंतर कमी करणे अशा सुधारणा प्रस्तावित होत्या.

पण आता बोर्डाकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. परिणामी या सगळ्या योजना सध्या थांबल्या आहेत. दरम्यान दौंडला उपनगरीय दर्जा प्राप्त या मार्गावर लोकल सुरू होणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!