Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना ज्या मेट्रोची आतुरता होती ती गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो येत्या काही दिवसात मार्गावर सुसाट धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान होईल आणि या मेट्रो बाबतची त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार गरवारे ते रुबी हॉल दरम्यान धावणारी मेट्रोचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो एप्रिल महिन्यात म्हणजे पुढील महिन्यात पुणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे.
याचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर या मार्गाची चाचणी होणार आहे आणि केंद्रीय समितीचा पाहणी दौरा आयोजित राहणार आहे. केंद्रीय समितीने या मेट्रो मार्गाची पाहणी केली की लगेचच हा मेट्रो मार्ग प्रकल्प पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये ही मेट्रो धावू शकते.
मेट्रो मार्गावर राहणार ही स्थानके
या मेट्रो मार्गामध्ये डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक ही स्थानके राहणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या स्थानकापैकी डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानक या रेल्वे स्टेशनचे कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. थोडेफार काम या रेल्वे स्टेशनची बाकी आहेत जे की लवकरच पूर्ण होतील असा आशावाद आहे. या दोन्ही रेल्वे स्टेशनची कामे पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम, पहा किती काम आहे बाकी?
या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफएस रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महापालिका, आरटीओ, वाडिया महाविद्यालय आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. निश्चितच शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून उदयास येत असलेल्या पुणे शहराच्या वैभवात यामुळे अजूनच भर पडणार आहे.
त्यामुळे आता पुण्यातील प्रवास गतिमान होण्यास मदत होईल असा दावा आहे. वास्तविक पुणे मेट्रो मार्ग प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अति महत्त्वाचा घटक मानला जात आहे. यामुळे हा मेट्रोमार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर शहरातील दळणवळण व्यवस्था अजूनच सक्षम बनणार आहे.
हे पण वाचा :- Panjabrao Dakh : पंजाबराव डख हवामान अंदाज सांगणं बंद करणार? पहा नेमकं काय आहे हे प्रकरण