पुणे मेट्रो संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट ! शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा ‘हा’ मेट्रो मार्ग मार्च 2026 मध्ये सुरु होणार

पुणेकरांना आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. पुढल्या वर्षी पुण्यातील जनतेला 23.3 किलोमीटर लांबीच्या नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून आज आपण याच बाबतची सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत.

Published on -

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुणे शहराला लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. सध्या पुण्यात महा मेट्रो कडून दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो धावत आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गांवर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दीड लाखांच्या वर पोहोचली आहेत. म्हणजेच पुणेकरांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला जातोय अशातच आता पुणे शहरातील मध्यवर्ती भागाला देखील मेट्रोची भेट मिळणार असल्याची बातमी हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित केला जाणार हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान चा मेट्रो मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रो मार्गाला पुणेरी मेट्रो म्हणून ओळखले जात असून आता आपण याच मेट्रोमार्गाबाबतची लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत.

कधी सुरु होणार नवा मेट्रो मार्ग ? 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण केले जात आहे. या प्रकल्पाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा पुण्यातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे जो की पीपीपी तत्त्वावर पूर्ण केला जातोय.

दरम्यान हा मेट्रो मार्ग लवकरच आता पूर्ण होणार आहे म्हणजेच पुणे शहरातील नागरिकांना आता शहराच्या मध्यवर्ती भागातून म्हणजे शिवाजीनगर मधून हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानापर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मेट्रो मार्गाचा पहिला ट्रायल रन नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाच्या मान डेपो ते पीएमआर 4 या स्टेशनपर्यंतच्या रूटवर हा ट्रायल रन पूर्ण झाला आहे. शिवाजीनगर – हिंजवडी हा 23.3 किलो मीटरचा कॉरिडोर आत्तापर्यंत 87% बांधून पूर्ण झाला आहे.

म्हणजेच या प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आल आहे. आणि म्हणूनच मार्च 2026 पर्यंत हा मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावर एकूण 23 स्टेशन विकसित होत आहेत आणि हा प्रकल्प मेट्रो मार्ग तीन म्हणून ओळखला जातोय. त्याला पुणेरी मेट्रो असेही नाव पडले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!