पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातील ‘हा’ भागही आता मेट्रोने कनेक्ट होणार, 23 KM लांबीचा नवा मार्ग लवकरच सुरू होणार, कसा असणार रूट ?

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील मेट्रोचे नेटवर्क आणखी वाढणार आहे. पुणेकरांना लवकरच आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. 

Published on -

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. सध्या स्थितीला महा मेट्रोचे दोन मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहे.

महा मेट्रो कडून या मार्गांचा विस्तार सुद्धा केला जाणार आहे. तर दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए कडून देखील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान आता याच नव्या मेट्रो मार्गाच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे, ती म्हणजे या मेट्रो मार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते ? याची एक नवीन संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान तयार होणार नवीन मेट्रो मार्ग

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती भागातून थेट आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडी पर्यंत मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. पीएमआरडीए कडून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. या मेट्रो मार्गाला पुणेरी मेट्रो म्हणून ओळखले जात आहे.

हा मार्ग 23 किलोमीटर लांबीचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता या 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रोमार्ग प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठीची नवीन डेडलाईन समोर आली आहे. या प्रकल्पाची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. 

काय आहे नवीन डेडलाईन 

हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किमी लांबीच्या पुणे मेट्रो लाईन 3 ची डेडलाईन मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी समितीने या निर्णयाला मान्यता दिली आहे.

शनिवारी आयुक्तांशी बोलताना पीएमआरडीए डॉ. योगेश म्हसे यांनी या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिलाय. म्हणजे शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो ने प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

कारण या प्रकल्पाची डेडलाईन वाढवण्यात आली आहे, हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास मार्च 2026 उजाडणार आहे. त्यानंतर मग या मेट्रो मार्गावर चाचण्या पूर्ण होतील आणि सर्व काही ठीक राहिलं की मग यावर मेट्रो धावेल.

मेट्रो प्रकल्पाव्यतिरिक्त, अधिकाऱ्यांनी विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर जंक्शनपर्यंतचा एकात्मिक डबल-डेकर उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ दिला आहे. त्या पायाभूत सुविधांसाठी नवीन लक्ष्य या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!