Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत, पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहेत.
महत्त्वाची बाब अशी की महा मेट्रो कडून सुरू करण्यात आलेल्या या मार्गांचे विस्तारीकरण देखील केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा कात्रज पर्यंत विस्तार केला जात आहे. दरम्यान याच स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

काय आहे नवीन अपडेट ?
पुणे मेट्रो लाईन 1 ज्याला पर्पल लाईन सुद्धा म्हटले जाते या पर्पल लाईनच्या विस्ताराअंतर्गत स्वारगेट ते कात्रज दरम्यान नवा मार्ग विकसित होणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा नवीन विस्तारित मेट्रो मार्ग 5.46 किलोमीटर लांबीचा राहील.
खरे तर या विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्पाला नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सरकारची मंजुरी मिळाली होती. दरम्यान आता या प्रकल्पासाठी सहा नामांकित कंपन्यांनी निविदा सादर केली आहे. कंपन्यांनी स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या बांधकामासाठी निविदा सादर केल्या असून सध्या या निविदांची तांत्रिक पडताळणी प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान, तांत्रिक पात्रता निश्चित झाल्यानंतर आर्थिक निविदा उघडल्या जातील आणि सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपनीची निवड होईल अशी माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.
म्हणजेच येत्या काही दिवसांनी या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात कंपन्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना वर्क ऑर्डर दिले जाईल आणि मग खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
कसा आहे विस्तारित मेट्रो मार्ग?
स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा विस्तारित टप्पा आहे. सरकारकडून या टप्प्याला नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आता या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे.
येत्या काही दिवसांनी ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर मग या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत 5.46 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग तयार केला जाणार आहे.
या विस्तारित मेट्रो मार्गावर एकूण पाच स्थानके विकसित केली जाणार आहेत. मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बाळाजीनगर आणि कात्रज ही नवीन स्थानके या मार्गावर विकसित होणार असून या भागातील नागरिकांना या मार्गाचा फायदा होणार आहे.
या मेट्रो मार्गामुळे कात्रज ते स्वारगेट हा प्रवास वेगवान होणार आहे. आता आपण या प्रकल्पाच्या बांधकामासाठी कोणकोणत्या कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या आहेत याची माहिती पाहूयात.
या कंपन्यांनी सादर केल्या निविदा
अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर
एचसीसी–केपीआयएल (HCC-KPIL) संयुक्त भागीदारी
आयटीडी सिमेंटेशन
जे. कुमार इंफ्राप्रोजेक्ट्स
लार्सन अँड टुब्रो (L&T)
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड