Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरातील रस्त्यांच्या आणि रेल्वेचे नेटवर्क मजबूत केले जात आहे. शहरात मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास अगदीच झपाट्याने होत आहे आणि यामुळे शहरातील बहुतांशी भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाले आहे.
मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास अगदीच अल्हाददायक आणि आरामदायी झाला आहे. दरम्यान याच पुणे मेट्रोच्या संदर्भात एक नव अपडेट हाती आला आहे. पुणेकरांना लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.

खरे तर सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन महत्त्वाच्या मार्गांवर महा मेट्रो कडून मेट्रोचे संचालन सुरू आहे आणि लवकरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएच्या माध्यमातून शहरातील तिसरा मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील हा तिसरा मेट्रो मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजे शिवाजीनगरला आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडी पार्क सोबत जोडणार आहे. दरम्यान याच तिसऱ्या मेट्रो मार्गाच्या संदर्भात एक नवीन माहिती आता हात येत आहे.
कधी सुरू होणार शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्ग?
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीए कडून अगदीच युद्धपातळीवर सुरु आहे. या मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण सुद्धा झाले आहे. तथापि या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत शक्य नाही.
यामुळे या प्रकल्पासाठी ची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला आता मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
यामुळे शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राजभवनाच्या जागेचा ताबा मिळण्यास उशीर झाल्याने या मार्गाचे काम लांबणीवर पडले आहे.
खरे तर राजभवनाच्या जागेचा ताबा फेब्रुवारी महिन्यात मिळाला मात्र या जागेत काम करण्यास सुरक्षेच्या कारणास्तव नकार मिळत आहे. पण परवानग्यांसाठी पीएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच कामाला परवानगी मिळणार आहे.
तथापि या मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित पंधरा टक्के काम देखील जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा आहे. या प्रकल्पा अंतर्गत पुलांचे काम पूर्ण झाले आहे तसेच रूळ सुद्धा टाकले गेले आहेत.
या मार्गावरील स्थानकांवर सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्युत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
दरम्यान आता या मेट्रो मार्गासाठी मार्च 2026 ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता तरी या नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.