Pune-Mumbai Expressway : पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या मेट्रो शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. या दोन शहरा दरम्यान प्रामुख्याने रस्ते मार्गे प्रवास होतो.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे (द्रुतगती महामार्ग) आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, घाट सेक्शन मध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.

यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे ते मुंबईचा प्रवास गतिमान करण्यासाठी घाट सेक्शन मध्ये मिसिंग लिंक तयार केला जात आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून आत्तापर्यंत 72 टक्के काम पूर्ण झाले आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स
या प्रकल्पांतर्गत आठ किलोमीटरचे दोन बोगदे तयार केले जात आहेत तसेच एक दरीपूल म्हणजेच व्हायडक्ट तयार करण्याचे नियोजन आहे. यापैकी बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून व्हायडक्टचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
या प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अर्थातच पुढील वर्षी मार्च महिन्यापासून हा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.
बोगद्याची खोदकामे पूर्ण झाली असून, बोगद्यांतील रस्ते बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन पुलांपैकी एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या दरीपुलाची उंची १८० मीटर असून, लांबी ५५० मीटर एवढी आहे.
मुंबई-पुणे प्रवास 45 मिनिटे लवकर
या प्रकल्पांतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूरच्या पुढे १.६ किलोमीटरचा आणि लोणावळ्याच्या दिशेने ८.९ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार केले जात आहेत. तसेच या दोन्ही बोगद्यांच्या दरम्यान दरी पूल म्हणजे व्हायडक्ट तयार केला जात आहे. वास्तविक या महामार्गावर खोपोलीपासून ते लोणावळ्यापर्यंत घाट आहे.
याचे अंतर हे जवळपास २२ किलोमीटरचे आहे. या घाट सेक्शन मध्ये शनिवारी-रविवारी म्हणजे विकेंडच्या वेळी मोठी गर्दी असते. घाट सेक्शन मध्ये वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. म्हणून घाटातील गर्दी टाळण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तयार केला जात आहे.
आता या प्रकल्पाचे 72 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या मार्च महिन्यात हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आठ ते १० किलोमीटरचे अंतर आणि ४५ मिनिटांचा कालावधी वाचणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘अस’ झालं तर तालुका कृषी अधिकारी राहणार जबाबदार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती