Pune Nashik High Speed Railway : पुणे अहमदनगर नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. खरं पाहता ही रेल्वे पुणे आणि नासिक या दोन औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी एक महत्वाची अशी रेल्वे लाईन असून यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि सहकार क्षेत्रासाठी गेम चेंजर जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला चालना लाभणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या रेल्वे लाईन ची लांबी ही 235 किलोमीटर एवढी राहील आणि रेल्वेचा वेग हा 200 किलोमीटर ताशी असा राहणार आहे. विशेष म्हणजे 250 किलोमीटर प्रति तास अशी रेल्वे या लाईनवर धावता येणं शक्य होणार आहे. साहजिकच गतिमान प्रवासासाठी या रेल्वे लाईनचा उपयोग होणार आहे.
यामुळे पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध होईल. दरम्यान यामुळे पुणे आणि नाशिक ही औद्योगिक दृष्ट्या दोन मुख्य शहरे जवळ येणार असून अवघ्या पावणे दोन तासात या दोन शहरा दरम्यान प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या रेल्वे मार्गाची विशेषता अशी की, या मार्गात २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग उभारले जाणार आहेत. तसेच भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम होणार आहे.
सध्या स्थितीला या रेल्वे मार्गासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जात आहे. संगमनेर तालुक्यातून हा रेल्वे मार्ग एकूण 70 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. निश्चितच संगमनेर तालुक्यात या रेल्वे मार्गचा एक मोठा भाग आहे, यामुळे संगमनेर तालुक्याच्या विकासाला या हाय स्पीड रेल्वेमुळे हाय स्पीड भेटेल अशी आशा जाणकार लोकांनी वर्तवली आहे. वर्गासाठी संगमनेर तालुक्यातील एकूण 26 गावात भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
विशेष म्हणजे यापैकी 15 गावात जमिनीचे मूल्यांकन हे झाले असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी हे मूल्यांकन मंजूर केला आहे. तसेच थेट खरेदी अंतर्गत आतापर्यंत 98 खरेदीखत हे झाले आहेत. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाचे भूसंपादन अधिकारी आणि संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. एकंदरीत संगमनेर तालुक्यात भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
राज्य शासनाने रेल्वे मार्गासाठी आवश्यक निधीची पूर्तता केल्यानंतर मार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यात आली. जमिनीचे मोजमाप झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यात आले अंतिमदर निश्चित करण्यात आले आणि आता प्रत्यक्षात संगमनेर तालुक्यात या मार्गासाठी भूसंपादन सुरू झाले आहे. साहजिकच आता हा मार्ग लवकरच पूर्णत्वास येईल आणि यामुळे पूणे, नगर आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बहुमूल्य असा वेळ वाचणार आहे.
संगमनेर तालुक्यातील इतक्या हेक्टर जमिनीचे होणार संपादन
मित्रांनो, संगमनेर तालुक्यात हा रेल्वे मार्ग 70 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजेच इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेर तालुक्याला याचा सर्वाधिक फायदा आहे. दरम्यान या मार्गासाठी तालुक्यातील २६ गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. तालुक्यात जवळपास २९३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूसंपादन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत संगमनेर तालुक्यात थेट खरेदीने १९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे.
विशेष म्हणजे या 19 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला देखील वर्ग करण्यात आला आहे. या थेट खरेदीच्या माध्यमातून संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात संबंधितांना २९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान खाजगी जमिनी व्यतिरिक्त या रेल्वे मार्गात वनविभागाची ४६ हेक्टर जमीन, सरकारची १५ हेक्टर जमीनही जाणार आहे. ही जमिन देखील रेल्वेला ताब्यात घ्यावी लागणार आहे.
या रेल्वे मार्गाचे भूसंपादन अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे सांगितल्याप्रमाणे, संगमनेर तालुक्यातील 15 गावात जमिनीचे मूल्यांकन झाले आहे म्हणजेच आता त्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे. आता उर्वरित 11 गावात देखील लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पार पडेल, जमिनीचे त्या ठिकाणी मूल्यांकन होईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना उचित मोबदला मिळेल असे देखील आश्वासन मंगरूळे यांनी यावेळी दिले आहे.
पुणे अहमदनगर नाशिक या रेल्वेमार्गासाठी संगमनेर तालुक्यातील कोणत्या गावात भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे याची यादी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.