Pune News : आपल्या भारतीय संस्कृतीत भूतदया परमो धर्मा या मंत्राच पालन केलं जातं. आपल्या घरातील थोर-मोठे, वडीलधाडील लोक प्राण्यांना हानी न पोहोचवता त्यांच्यावर प्रेम करण्याचा सल्ला देतात. अगदी लहान वयात शिकवलेले हे भूतदयाचे धडे आपण देखील निश्चितच आपल्या आयुष्यात पाळत असतो. आपणही प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतो. विशेषतः शेतकरी कुटुंबातून येणारा प्रत्येक जण हा भूतदया परमो धर्मा या संस्काराने तयार झालेला असतो.
मुक्या जनावरांवर जर आपण जीव टाकला तर ते देखील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर जीव ओवाळून टाकत असतात. असंच एक उदाहरण पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे पाहायला मिळाले आहे. मुळशी येथील हिरेमठ हे शेतकरी कुटुंब मुक्या जनावरांवर अतोनात असं प्रेम करत. या कुटुंबातील शेतकरी आबासाहेब हिरेमठ यांचं आपल्या गोठ्यातील बैलावर आणि त्यांनी पाळलेल्या पाळीव कुत्रा वर मोठं प्रेम होत.
आबासाहेब हे या आपल्या बैल आणि कुत्रा सोबत कायमच वेळ घालवत असत. त्यांच्यासोबत शेतीची राखण करत. शेतीमध्ये फेरफटका मारण्यासाठी देखील आबासाहेब आणि त्यांचे हे दोन सवंगडी कायमच सोबत असत. मात्र, काळाने आबासाहेबांवर घात केला. त्यांच अचानक हृदयविकाराने वैकुंठगमन झालं. यामुळे या हिरेमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबांसमवेतच या दोन मुक्या जनावरांना देखील बाबासाहेबांच्या जाण्याने मोठं दुःख झालं. हे मूके जनावर बोलून तर दाखवू शकत नाही मात्र त्यांच्या कृतीतून त्यांना झालेल्या दुःखाची प्रचिती मात्र आली.
आबासाहेबांना जाऊन तब्बल सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरीदेखील या मुक्या जनावरांचे दुःख काही कमी झाले नाही. हेच कारण आहे की आबासाहेबांना ज्या ठिकाणी अग्नीडाग देण्यात आला त्यां ठिकाणी त्यांनी पाळलेला हा कुत्रा आणि त्यांच्या गोठ्यातील हा बैल रोज रात्री नऊ वाजता जात असतात. संपूर्ण रात्रभर त्या ठिकाणी पहारा देतात. आपल्या मालकाची तो गेल्यानंतर देखील सेवा करतात आणि सकाळी सहा वाजले की घरी परततात. निश्चितच ही हृदयस्पर्शी कथा मुक्या जनावरांचा निस्वार्थ भाव, त्यांच्यावर जर जीव ओवाळून टाकला तर ते अखेरच्या श्वासापर्यंत आपल्यावर जीव टाकतात याच एक उत्तम उदाहरण आहे.
हिरेमठ कुटुंब सांगतं की मालक गेला पण मालकाचा पाठीराखा आजही त्यांच्या मालकाची पाठ राखण करत आहे हे पाहून आजही मन गहिवरून येत. हिरेमठ कुटुंब सांगता की बाबासाहेबांना सुरुवातीपासूनच मुक्या जनावरांची मोठी आवड होती. त्यांचं प्राण्यांवर मोठं प्रेम होतं. कारण होतं की त्यांनी घर राखण्यासाठी कुत्रा आणि शेतीच्या कामांसाठी बैल ठेवले होते. आबासाहेब हयात असताना आपल्या बैलाला आणि कुत्र्याला सकाळी उठल्याबरोबर जेवणाला घालत. बिलाला चारा आणि कुत्र्याला गरम गरम पोळी सकाळी सकाळी दिली जात असे.
एकदाच जेवण झालं की मग आबासाहेब आणि त्यांचे हे दोघ सखे शेतावर फेरफटका मारण्यासाठी जात. आबासाहेब जोपर्यंत हयात होते तोपर्यंत हा दिनक्रम एक दिवसही बदलला नाही. त्यांचं बैलावर आणि कुत्र्यावर असलेलं हे प्रेम आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि आता आबासाहेब ह्यात नसताना त्यांच्या कुत्र्याचं आणि बैलाचं आबासाहेबांवरचे प्रेम आम्हाला पाहायला मिळत आहे. खरं पाहता हिरेमठ कुटुंबीयांना आबासाहेबांचा आपल्या जनावरावरच प्रेम आणि जनावरांचं आपल्या मालकावरचे प्रेम याची माहिती होती.
यामुळे या मुक्या जनावरांना आबासाहेबांची उणीव भासू नये यासाठी त्यांनी आबासाहेबांचा अंत्यविधी त्यांच्या शेतातच केला. आबासाहेब अनंतात विलीन झाले मात्र त्यांचा कुत्रा आणि बैल दुःखेने व्याकुळ होते. आबासाहेब गेल्यानंतर त्यांनी कित्येक दिवस अन्नाचा त्याग देखील केला. आणि आता आबासाहेबांची अंत्यविधी ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी रोज रात्री त्यांचा कुत्रा आणि बैल पहारा देतात आणि सकाळी घरी परततात. त्यामुळे मुक्या जनावरांवर जर भूतदया दाखवली तर ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर प्रेम करत राहतात याचच हे एक उत्तम उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल.