Pune Railway News : पुणे शहरासह जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.
उन्हाळ्याच्या काळात पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक असते. वास्तविक पाहता, पुणे ते नागपूर दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक आहे.

पण सणासुदीच्या काळात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढते. हीच गोष्ट विचारात घेता रेल्वेच्या माध्यमातून पुणे ते नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार असून आज आपण याच विशेष गाडीच्या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने पुणे ते नागपूर दरम्यान एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विशेष गाडी सुरु केली जाणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक ०१४६९) नऊ एप्रिल पासून चालवली जाणार आहे. ही नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस ९ एप्रिल ते २५ जूनपर्यंत चालवली जाणार आहे.
ही गाडी साप्ताहिक राहणार आहे म्हणजेच आठवड्यातून एक दिवस सोडली जाणार आहे. ही ट्रेन बुधवारला सकाळी ८ वाजता सुटणार आहे आणि नागपूर रेल्वे स्थानकावर या गाडीचे आगमन त्याच दिवशी रात्री ११. ३० वाजता होणार आहे.
गाडी क्रमांक ०१४६७ ही पुणे- नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन परतीच्या प्रवासात चालवली जाणार आहे. ही ट्रेन पुण्याहून ९ एप्रिल ते २५ जून पर्यंत आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे म्हणजेच ही गाडी साप्ताहिक राहणार आहे.
या काळात ही गाडी बुधवारला नागपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि नागपूरला या विशेष गाडीचे आगमन दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता होईल.
गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस नागपूरहून १० एप्रिल ते २६ जून पर्यंत आठवड्यातून एक दिवस, गुरुवारला सकाळी ८ वाजता सुटेल आणि नागपूर आगमन त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता होईल.
नक्कीच या गाडीमुळे नागपूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून उन्हाळी सुट्ट्यांच्या गर्दीमध्ये देखील प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.