पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ शहरादरम्यान सुरू झाली स्पेशल सुपरफास्ट ट्रेन; पहा कसं आहे वेळापत्रक? कुठं आहेत थांबे?

Ajay Patil
Published:
Pune Railway News

Pune Railway News : उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विद्यार्थी, नोकरदारवर्ग आता सुट्ट्यांमुळे गावाकडे जात आहेत. यामुळे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या मार्गावर विशेष ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना सोयीचे होत आहे.

रेल्वेच्या या निर्णयामुळे अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येत असून गर्दी असूनही प्रवाशांना वेळेत आपला प्रवास पूर्ण करता येत आहे. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याहून गोरखपुर दरम्यान एक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख म्हणताय की उद्यापासून आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? पहा…

उद्यापासून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. म्हणजेच एप्रिल 2023 पासून ही पुणे गोरखपुर पुणे स्पेशल ट्रेन सुरू होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार उद्या सुरू होणारी ही ट्रेन 17 जून 2023 पर्यंत चालवली जाणार आहे. म्हणजेच जवळपास 18 फेऱ्या ही ट्रेन मारणार आहे.

त्यामुळे निश्चितच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण पुणे गोरखपूर पुणे या स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक तसेच या ट्रेनला कुठे-कुठे थांबे राहणार आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- खुशखबर! सरकारी नोकरभरतीत आता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र लागणार नाही; सरकारने घेतला मोठा निर्णय

कसं असेल वेळापत्रक?

उद्यापासून सुरू होणारी ही ट्रेन दर शुक्रवारी पुणे रेल्वे स्टेशन वरून सायंकाळी सव्वाचार वाजता गोरखपुर कडे रवाना होणार आहे. ही ट्रेन गोरखपुर रेल्वे स्टेशनला दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता गोरखपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे. तसेच ही ट्रेन गोरखपुरहुन दर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता पुण्याकडे रवाना होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी सव्वा सात वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.

या ट्रेनला कुठे राहणार थांबे?

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे गोरखपुर पुणे ही विशेष गाडी दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगणा राणी लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलिलाबाद या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. 

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात विकसित होत असलेला ‘हा’ चार मजली उड्डाणपूल ‘या’ महिन्यात बांधून तयार होणार, पहा…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe