पुणेकरांना करता येणार भूमिगत मेट्रोतून प्रवास! वाचा किती आहेत तिकीट दर आणि कोणत्या स्थानकांवर करता येईल प्रवास?

वाहतूक कोंडी पासून दिलासा आणि जलद प्रवासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा या भूमिगत मेट्रोमार्गाचा होणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो मार्गीकाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Published on -

पुण्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या भूमिगत मेट्रोचे अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला व आज पुणेकरांची अनेक दिवसांची प्रतीक्षा आज संपली. हा भूमिगत मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा असून रस्त्याने प्रवास करताना ज्या ठिकाणी 40 ते 50 मिनिटांचा कालावधी लागत होता तो प्रवास फक्त नऊ ते दहा मिनिटांमध्ये पुणेकरांना शक्य होणार

असल्याने वाहतूक कोंडी पासून दिलासा आणि जलद प्रवासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा या भूमिगत मेट्रोमार्गाचा होणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो मार्गीकाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

हा एक महत्वपूर्ण असा प्रकल्प असून हा प्रकल्प उभारण्यासाठी एक हजार आठशे दहा कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. पुणे मेट्रोचा हा पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत असून बाकीचे टप्पे देखील हळूहळू  प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येतील.

 किती आहे तिकीट दर आणि कोणत्या स्थानका दरम्यान करता येईल प्रवास?

पुणे मेट्रोची ही सेवा प्रवाशांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत असणार असून जेव्हा गर्दी जास्त असेल तेव्हा दर सात मिनिटांनी ही मेट्रो धावणार आहे व जेव्हा गर्दीचे प्रमाण कमी असेल तेव्हा तर दहा मिनिटांनी हे मेट्रो धावणार आहे.

या मेट्रोचे तिकीट दर पाहिले तर जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ या प्रवासाकरिता दहा रुपये तर जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते मंडई मेट्रो स्थानकासाठी 15 रुपये इतका तिकीट दर असणार आहे.

यासोबतच जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक यादरम्यानच्या प्रवासाकरिता पंधरा रुपये आकारले जाणार आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे पंधरा रुपयांमध्ये आपल्याला तासभराचा प्रवास फक्त दहा मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे या भूमिगत मेट्रोमुळे आता पुणेकरांना पिंपरी चिंचवड ते थेट स्वारगेट असा प्रवास करता येणे शक्य होणार असून वनाज आणि रामवाडीचे प्रवाशी इंटरचेंज करून स्वारगेटला पोहोचू शकणार आहे.

या भूमिगत मेट्रोची प्रतीक्षा पुणेकरांना गेल्या कित्येक दिवसापासून होती व आता भूमिगत मेट्रो सुरू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी या मेट्रोला पुणेकरांच्या माध्यमातून भरघोस प्रतिसाद मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News