Pune Ring Road : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रस्ते विकासाच्या कामाला मोठी गती दिली जात आहे. वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून देखील रस्ते विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
अशातच पुणे-छत्रपती संभाजी नगर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून जोरात प्रयत्न सुरू आहेत. शिवाय पुणे रिंग रोड देखील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जात आहे. पुणे रिंग रोडला मात्र पुणे छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील कॉरिडॉर चा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या ग्रीनफिल्ड महामार्गामुळे पुणे रिंग रोड चे अंतर तब्बल 30 किलोमीटरने कमी होणार आहे.
यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाचा जवळपास 3000 कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचा दावा केला जात आहे. खरं पाहता पुणे रिंग रोड आणि पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड कॉरिडोर एकूण बारा गावात एकत्र येत आहे. अशा परिस्थितीत या 12 गावात दोन वेगवेगळे रस्ते तयार करणे ऐवजी एकच रस्ता तयार केला जाणार आहे. यामुळे दोनदा भूसंपादन करावे लागणार नाही. शिवाय ज्या 12 गावातून हे मार्ग एकत्र जात आहेत त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधकाम केल जाणार आहे. म्हणजे पुणे रिंगरोड आणि ग्रीन फील्ड कॉरिडोरचे 30 किलोमीटरचे एकत्रित असलेले काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला एकूण दोन भागात म्हणजेच पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड अस विभागल गेल आहे. पूर्व भागातील रिंग रोड हा जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यात प्रस्तावित आहे. या पूर्व रिंगरोडची एकूण लांबी 66 किलो मीटर असून पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथून सुरू होणार असून, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से येथे येऊन मिळणार आहे. या रिंग रोड साठी भूसंपादनाची प्रक्रिया येत्या काही दिवसात राबवली जाणार आहे.
पश्चिम रिंग रोड ची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेला पुणे छत्रपती संभाजी नगर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर हा एमएसआरडीसी च्या पूर्व पुणे रिंग रोडला येऊन मिळतो. पूर्व भागातील जवळपास 12 गावात हे रस्ते एकत्र जाणार आहेत. हे अंतर जवळपास 30 किलोमीटर आहे. यामुळे हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे यासाठी निधी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच द्यावा असं ठरलं आहे. यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाचा 3000 कोटी रुपयांचा फायदा या ठिकाणी होणार आहे.