Pune Solapur National Highway : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बाबत एक मोठा अपडेट समोर आलं आहे. खरं पाहता पुणे सोलापूर नॅशनल हायवे हा चांगलाच वर्दळीचा आहे. या मार्गावर रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात.
परंतु, या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वरळी कांचन, थेऊर फाटा, लोणी काळभोर या तीन ठिकाणी अंडरपास अर्थातच भुयारी मार्ग उभारण्यासाठी NHI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
खरं पाहता, या नॅशनल हायवे 65 वर अपघातात मोठी वाढ होत असल्याने खासदार अमोल कोल्हे यांनी हडपसर ते उरळीकांचन दरम्यान एलेवेटेड रस्ता बांधण्याची मागणी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती. मात्र या कामासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
अशा परिस्थितीत, अमोल कोल्हे यांनी ज्या ठिकाणी अधिक अपघात होत आहेत अशी महत्त्वाची जंक्शन सुरक्षित करण्यासाठी सूचना दिली होती. या अनुषंगाने आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एकूण तीन ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यास परवानगी दिली आहे. खरं पाहता दिवसेंदिवस या राष्ट्रीय महामार्ग 65 वर अपघातांची संख्या वाढत होती.
अपघातात अनेकांना आपला जीव कमवावा लागत होता, अनेकांना अपंगत्व देखील येत होते. अशा परिस्थितीत लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी यामध्ये लक्ष घातले आणि एलेवेटेड रस्त्याची मागणी केली.
मात्र या रस्त्यातला उशीर होणार असल्याने किमान महत्त्वाच्या जंक्शन्स वर भुयारी मार्ग केले पाहिजेत अशी सूचना कोल्हे यांनी केली होती. अखेर कार कोल्हे यांच्या या पाठपुराव्याला अन सूचनेला यश आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उरळी कांचन (कि. मी.२८/९१०), लोणी (कि. मी. १७/५००) आणि थेऊर फाटा (कि. मी. २०/२८०) याठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या भुयारी मार्ग म्हणजेच अंडरपास मुळे मोठ्या प्रमाणात अपघातात कपात होईल, महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षा होईल अशी आशा आता स्थानिक लोकांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे रस्त्यावर जाणारे पादचारी आणि स्थानिकांना देखील सुरक्षा लाभणार आहे.
यावेळी अमोल कोल्हे यांनी या तीन भुयारी मार्गामुळे मोठ्या प्रमाणात अपघात कमी होतील अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच हे तिन्ही भुयारी मार्ग लवकरात लवकर कशा पद्धतीने होतील यासाठी मी पाठपुरावा करत राहील असे देखील यावेळी त्यांनी नमूद केलं. निश्चितच या तीन अंडरपासमुळे पुणे सोलापूर हायवे अजूनच सुरक्षित होणार आहे.