पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! पावणे दोन एकरात सुरू केली आल्याची शेती, मिळाले 18 लाख 50 हजाराचे उत्पन्न, बनलेत लखपती; पहा ही भन्नाट यशोगाथा

Pune Successful Farmer

Pune Successful Farmer : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केल्याने काय होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण पुणे जिल्ह्यातून समोर येत आहे. शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्याकडे व्यवसायाप्रमाणेच पाहणे गरजेचे आहे. इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीमध्ये काळाच्या ओघात, बदलत्या वेळेनुसार बदल करणे अतिशय आवश्यक आहे. अलीकडे राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.

त्यातल्या त्यात पुणे जिल्हा म्हटलं की जिल्ह्यातील शेतकरी कायमच शेतीमध्ये नवनवीन बदल करत असतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच आपलं वेगळं पण सिद्ध करण्याचे काम केले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या मौजे निंबूत येथे देखील असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळाला आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता वर्सोवावरून समुद्रमार्गे पालघर जाता येणार; प्रवासाचा वेळ येणार निम्म्यावर, पहा कसा असेल मार्ग

निंबूत तेथील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क आल्याची शेती करून दाखवली आहे. वास्तविक आणि म्हटले की आल्याची लागवड आपल्या राज्यात सातारा, सांगली या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसर आले उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. मात्र बारामती सारख्या भागात देखील आल्याची शेती यशस्वी होऊ शकते हे दाखवून दिले आहे निंबूत येथील संभाजीराव काकडे या प्रयोगशील शेतकऱ्याने.

संभाजीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी त्यांनी पावणेदोन एकर शेतीमध्ये आल्याची लागवड केली होती. मात्र गेल्या वर्षी टनाला दहा हजाराचा भाव मिळाला यामुळे त्यांना आल्याच्या शेतीत तोटा सहन करावा लागला. मात्र झूकेगा नही साला असं म्हणतं संभाजीराव यांनी पुन्हा एकदा आले शेती करण्याची डेरिंग केली. यावर्षी त्यांनी पुन्हा पावणेदोन एकर क्षेत्रावर आल्याची शेती केली. त्यातून 28 टन आल्याचे उत्पादन मिळाले आणि 66 हजार प्रति टनाला भाव मिळाला.

हे पण वाचा :- स्कायमेट वेदरचा अंदाज आला रे…! यंदा कसा असणार मान्सून? अल निनो राहणार का? पहा काय म्हणतंय Skymet Weather

यामुळे त्यांना पावणेदोन एकरातून साडेअठरा लाख रुपयांची कमाई झाली. यासाठी त्यांना चार लाख रुपयाचा खर्च आला असून खर्च व जाता जवळपास साडेचौदा लाख रुपयांची कमाई त्यांना झाली आहे. यामुळे सध्या संभाजीराव यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. खरं पाहता बारामती व आजूबाजूचा परिसर आले लागवडीसाठी ओळखला जात नाही.

या भागात आल्याची शेतीचं होत नाही यामुळे हा आले शेतीचा प्रयोग परिसरासाठी नवखाच होता. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होतो की नाही अशी शँका संभाजीराव यांना वाटत होती. मात्र तरीही योग्य व्यवस्थापन करून, शेतीमध्ये अहोरात्र काबाडकष्ट करून आल्याची शेती त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे आणि यावर्षी त्यांनी यातून साडेचौदा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवून इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

हे पण वाचा :- कोकणच्या केशर आंब्याप्रमाणे प्रसिद्ध आहे अहमदनगरमधील ‘टिकल्या आंबा’; याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाखमोलाची, वाचा याच्या विशेषता

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe