पुण्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनची पण भेट मिळणार ! कुठून कुठपर्यंत धावणार?

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला लवकरच पाच नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल. यातील चार गाड्या चेअरकार प्रकारातील असतील, तर एक गाडी शयनयान प्रकारातील म्हणजेच वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल.

Published on -

Pune Vande Bharat Sleeper Train : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्याला आगामी काळात चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. यासोबतच पुण्याला एक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा मिळणार आहे. खरे तर सध्या स्थितीला पुण्यावरून दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या दोन वंदे भारत एक्सप्रेसला गेल्यावर्षी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या वंदे भारत एक्सप्रेसच्या संचालनानंतर पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावरील प्रवास फारच वेगवान झाला आहे आणि या गाड्यांना प्रवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद सुद्धा दिला जातोय. दरम्यान आता पुणेकरांसाठी लवकरच चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस आणि एक नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या मार्गावर चालवल्या जाणार वंदे भारत एक्सप्रेस

महाराष्ट्रात सध्या 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलास्पुर, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते सिकंदराबाद या 11 मार्गांवर सध्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

दरम्यान येत्या काही महिन्यांनी पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते वडोदरा आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर देखील वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

असे झाल्यास पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सहा वर पोहोचणार आहे आणि महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 15 वर जाणार आहे. नक्कीच या मार्गावर जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर पुणेकरांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे.

या मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते वडोदरा या चार मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. तसेच पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

खर तर सध्या संपूर्ण देशभरात चेअर कार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र लवकरच भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. या अनुषंगाने रेल्वे कडून कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. या चालू आर्थिक वर्षात देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्षात धावताना दिसणार आहे.

पुणे ते नागपूर या मार्गावर देखील वंदे भारत स्लीपर ट्रेन धावू शकते अशी माहिती आता मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. नक्कीच ही जर माहिती खरी असेल तर यामुळे पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!