पुणेकरांना लागली लॉटरी ! Pune रेल्वे स्थानकातून आणखी 4 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार , कसे असणार रूट ?

पुण्याला आणखी चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पुण्याला दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. आता पुण्यातील हे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे.

Published on -

Pune Vande Bharat Train : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आगामी काळात पुणे रेल्वे स्थानकातून आणखी चार नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

यातील दोन गाड्या थेट पुणे रेल्वे स्थानकावरून सोडल्या जातात तर एक गाडी मुंबई रेल्वे स्थानकावरून सुटते आणि पुण्यावरून धावते. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या दोन गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरून धावत आहेत आणि मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे चालवली जात आहे.

दरम्यान आता पुण्याला चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली असून यामुळे पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसची एकूण संख्या 7 वर पोहोचणार आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी मध्य रेल्वे कडून पुण्यातून चार वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली होती.

पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा, पुणे ते बेळगाव आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे पुण्याहून शेगाव, वडोदरा, बेळगाव आणि सिकंदराबाद दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मात्र या गाड्या कधीपर्यंत रुळावर धावणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. 

पुणे – वडोदरा वंदे भारत एक्सप्रेसचा रूट कसा असणार

यातील पुणे वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर या गाडीमुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास दोन ते तीन तासांनी कमी होणार आहे. पुणे ते वडोदरा वंदे भारत ट्रेन सहा ते सात तासात आपला प्रवास पूर्ण करेल आणि ही गाडी या प्रवासादरम्यान लोणावळा, पनवेल, वापी, सूरत अशा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर येत आहे.  

पुणे – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा रूट कसा असणार ?

पुणे ते सिकंदराबाद दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून दौंड, सोलापूर, गुलबर्गामार्गे सिकंदराबादला जाईल. ही गाडी दौंड, सोलापूर, गुलबर्गा या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेईल. या गाडीमुळे प्रवासाचा वेळ दोन ते तीन तासांनी कमी होणार आहे. 

पुणे – बेळगाव वंदे भारत एक्सप्रेसचा रूट कसा असणार?

मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी पुण्यावरून सातारा, सांगली, मिरजला जाईल अन मग तिथून पुढे बेळगावला रवाना होईल. या गाडीला सातारा, सांगली, मिरज या स्थानकावर थांबा राहणार आहे. या गाडीचे तिकीट दर पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान राहिल असा अंदाज आहे.

पुणे – शेगाव वंदे भारत एक्सप्रेसचा रूट

पुणे – शेगाव वंदे भारत एक्सप्रेस चा रूट बाबत बोलायचं झालं तर ही गाडी दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना अशी धावणार आहे. या गाडीला दौंड, अहिल्या नगर, संभाजीनगर, जालना या स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर केला जाऊ शकतो. या गाडीमुळे पुणे ते शेगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!