Punjab Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवले होते. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तळ कोकणात आणि मुंबईमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता मात्र कमी झाली आहे. परंतु राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम आहे.
मात्र अवकाळी पावसाने थोडी उघडीप दिली असल्याने बहुतांशी भागात शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. अशातच हवामान तज्ञ पंजाब डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.
अशा परिस्थितीत आता डख मे महिन्यातील हवामानाबाबत काय अंदाज व्यक्त करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज आपण डख यांनी 5 मे 23 मे पर्यंत कसं हवामान राहील याबाबत नेमका काय अंदाज व्यक्त केला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Punjab Dakh यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे आणि 6 मे अर्थातच उद्या आणि परवा विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच 6, 7 आणि 8 मे रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात अगदी पावसाळ्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांनी आणि सामान्य जनतेने अधिक सजग राहायचे आहे.
यानंतर मात्र नऊ मे ते 16 मे 2023 राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. या कालावधीत तापमान वाढीची देखील शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे.
यानंतर 17 मे ते 19 मे 2023 दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नंतर 21 मे ते 23 मे दरम्यान राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार असल्याचे मत डख यांनी व्यक्त केले आहे.