शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….

Punjab Dakh News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. उन्हाळा आता जवळपास संपत चालला तरी देखील अवकाळी पावसाने राज्यातून काढता पाय घेतलेला नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत आहे. अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पंजाब डख यांनी आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज म्हणजेच 2 मे 2023 रोजी राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा :- पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; प्रवाशांचा अर्ध्या तासाचा वेळ वाचणार, ‘हा’ अति महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला, वाचा सविस्तर

निश्चितच, पंजाब डख यांचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. उद्यापासून मात्र दोन दिवस पावसाची उघडीप राहणार आहे.

तीन मे आणि चार मे रोजी राज्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. मात्र पाच तारखेपासून पुन्हा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे.

पाच मे, सहा मे आणि सात मे रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्र, नासिक अहमदनगर तसेच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. 

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज

यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पावसाची शक्यता लक्षात घेता आपल्या शेती पिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या पशुधनाची देखील काळजी घेणे जरुरीचे आहे.

पण 9 मे 2023 पासून उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढणार आहे. 9 ते 16 मे दरम्यान उन्हाची तीव्रता वाढेल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यामुळे हा देखील अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10वी, 12वी चे निकाल, वाचा सविस्तर