पंजाब डख यांचा हवामान अंदाज; अवकाळीच संकट अजून गेले नाही, पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Published on -

Punjab Dakh News : भारतीय हवामान विभागाने आज 4 मे 2023 रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडू शकतो.

मध्य महाराष्ट्रमधील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.

हे पण वाचा :- शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पहा….

तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

याशिवाय आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाब डख यांनी देखील महाराष्ट्रात उद्यापासून पावसाची शक्यता वर्तवली आहे.

डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज अर्थातच चार मे रोजी राज्यात पावसाची शक्यता राहणार नाही. मात्र उद्या म्हणजेच 5 मे 2023 पासून ते 7 मे पर्यंत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मात्र पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, नासिक, अहमदनगर तसेच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

7 तारखे नंतर मात्र राज्यात पाऊस विश्रांती घेणार असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 मे पासून उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

नऊ मे ते 16 मे दरम्यान राज्यात तापमानात वाढ होणार आहे. साहजिकच या कालावधीमध्ये नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात तापमान जवळपास 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकते. निश्चितच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत येणार असल्याने नऊ मे नंतर नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News