रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! येत्या दोन आठवड्यात आणखी एक वंदे भारत ट्रेन रुळावर येणार, कसा असणार रूट?

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या दोन आठवड्यात एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे नेटवर्क आणखी विस्तारले जाईल अशी आशा आहे.

Published on -

Railway News : देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी वाढणार आहे. येत्या दोन आठवड्यात आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

सध्या देशभरातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत आणि लवकरच हे जाळे आणखी वाढणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आगामी काळात सांस्कृतिक राजधानी पुण्याला चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पुणे ते वडोदरा, पुणे ते बेळगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते शेगाव या चार मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती.

अशी सगळी परिस्थिती असतानाच आता नागपूर – इंदूर वंदे भारत एक्सप्रेस नंतर इंदूरला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे.

या मार्गावर धावणार नवीन वंदे भारत 

भारतीय रेल्वेकडून इंदूर ते निजामुद्दीन रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. इंदूर ते दिल्ली दरम्यान चालवली जाणारी ही गाडी इंदूरला मिळणारी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस राहणार आहे.

नागपूर – इंदोर वंदे भारत ट्रेन नंतर नागपूर ते दिल्ली ही वंदे भारत सुरू होणार आहे आणि या गाडीची चाचणी या चालू महिन्यातच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या नव्या गाडीची चाचणी हरियाणा राज्यातील पलवल आणि मथुरा या 87 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर होणार आहे.

या गाडीचा सरासरी वेग 120 ते 130 किलोमीटर प्रति तास इतका राहणार आहे तर कमाल वेग 160 किलोमीटर प्रतितास इतका असेल. चाचणी दरम्यान ही गाडी आग्रा केंट या स्टेशनवर पाच ते सात मिनिटांपर्यंतचा थांबा घेण्याची शक्यता आहे. चाचणीच्या वेळी सहा ते आठ कोच असणारी वंदे भारत ट्रेन वापरली जाणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की या चाचणीसाठी वंदे भारत ट्रेनचा एक नवीन रेक नवी दिल्लीत पोहोचला आहे. यामुळे या गाडीची लवकर चाचणी सुरू होणार असा आशावाद व्यक्त होतोय. मात्र चाचणीची तारीख ही रेल्वे बोर्डाकडूनच निश्चित केली जाणार आहे यामुळे या गाडीची चाचणी कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

खरंतर इंदूरचे खासदार शंकर लालवाणी यांनी इंदूर आणि नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत ट्रेनची मागणी केली होती. सहा महिन्यांपूर्वी लालवानी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे ही मागणी केली होती आणि यानुसार आता इंदूर ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!