Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी पुन्हा एका नव्या गाडीची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे कडून तिरुपती ते हिसार दरम्यान नवीन विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
ही गाडी आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकामध्ये थांबा घेणार आहे. या गाडीला राज्यातील तब्बल 13 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना या गाडीचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे.

दरम्यान आता आपण हिसार ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या याच साप्ताहिक विशेष गाडीच्या वेळापत्रकबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याची सुद्धा माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाकडून हिसार ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे म्हणजे ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावेल. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर तिरुपती – हिसार साप्ताहिक विशेष गाडी (ट्रेन क्रमांक 07717) आज पासून अर्थातच 9 जुलै 2025 पासून ते 24 सप्टेंबर 2025 पर्यंत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर बुधवारी रात्री अकरा वाजून 45 मिनिटांनी तिरुपती रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि शनिवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी हिसार रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच हिसार तिरुपती साप्ताहिक विशेष गाडीच्या वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर ट्रेन क्रमांक 07718 ही स्पेशल गाडी 13 जुलै ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता ही गाडी तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार नवीन गाडी?
या नव्या स्पेशल ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही नवी गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेण्याची शक्यता आहे. धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार या महाराष्ट्रातील 13 महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे.