Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान जर तुम्ही ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेने अलीकडेच एक नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नव्या नियमाची अंमलबजावणी येत्या एका तारखेपासून म्हणजेच एक जुलै 2025 पासून होणार आहे.
काय आहे नवा नियम ?
रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय करोडो रेल्वे प्रवाशांसाठी खास आहे कारण की हा निर्णय तत्काळ तिकिट बुकिंगबाबत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक जुलै 2025 पासून फक्त तेच प्रवासी तत्काळ तिकिटे बुक करू शकतील ज्यांचे आधार कार्ड आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवर व्हेरिफाय करण्यात आलेले आहे.
रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी सर्व झोनल रेल्वेंना एक परिपत्रक जारी करून कळवले की, तत्काळ तिकीट योजनेअंतर्गत आता फक्त अशा वापरकर्त्यांनाच तिकिटे उपलब्ध असतील ज्यांनी आयआरसीटीसी पोर्टलवर त्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट केला आहे आणि ओटीपीद्वारे पडताळणी केली आहे.
नव्या नियमाचा फायदा काय होणार ?
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या पायरीचा उद्देश फक्त खऱ्या प्रवाशांनाच तत्काळ तिकीट योजनेचे फायदे मिळवून देणे आहे. यापूर्वी या योजनेचा दुरुपयोग मध्यस्थ आणि दलालांनी केला होता, ज्यामुळे खऱ्या प्रवाशांना तिकिटे मिळत नव्हती.
यामुळे हा नवीन नियम आता तयार करण्यात आला आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आधार पडताळणीमुळे बनावट बुकिंग थांबवली जाणार आहे आणि तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता सुद्धा येणार आहे.
खरेतर, तत्काळ तिकीट योजनेअंतर्गत प्रवासी प्रवासाच्या एक दिवस आधीचं तिकीट बुक करू शकतात, मात्र सीट्स मर्यादित असतात आणि सीट्स लवकर फुल होतात. पण आता नवीन नियमानंतर, तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे कारण केवळ आधारने सत्यापित केलेले वापरकर्तेच यापुढे बुकिंग करू शकतील.
याशिवाय, आयआरसीटीसीने तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यापासून पहिल्या 10 मिनिटांत, ज्या प्रवाशांचे आयआरसीटीसी खाते आधारशी जोडलेले आहे तेच प्रवासी तिकिटे बुक करू शकतील अशी माहिती देखील यावेळी दिली आहे.
महत्त्वाची बाब अशी की या काळात, अधिकृत एजंट देखील तिकिटे बुक करू शकणार नाहीत, ज्यामुळे तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता आणि प्राधान्य सुनिश्चित होण्यास मदत मिळणार आहे.