Railway Recruitment 2024:- अनेक उमेदवार वेगवेगळ्या भरती परीक्षांची तयारी करतात व अशा उमेदवारांसाठी सध्याच्या कालावधीमध्ये अनेक विभागांमार्फत भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत असून अशा प्रकारच्या भरती संदर्भात अधिसूचना देखील जाहीर करण्यात येत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण भारतीय रेल्वे विभागाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक उमेदवारांची भारतीय रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते व त्या पद्धतीने ते तयारी देखील करत असतात.

अशाच प्रकारे भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांकरिता एक आनंदाची बातमी असून रेल्वे बोर्ड अर्थात आरआरबीच्या माध्यमातून विविध श्रेणीमध्ये पॅरामेडिकल पदांसाठीच्या भरतीकरिता एक अधिसूचना जाहीर करण्यात आलेली असून या माध्यमातून तब्बल 1376 रिक्त जागा भरल्या जाणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.
भारतीय रेल्वेत 1376 रिक्त जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून पॅरामेडिकल पदांसाठी भरती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या भरतीतून १३७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
यामध्ये जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील ते 17 ऑगस्ट पासून अर्ज करू शकतात व अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे.
याबाबत अर्ज करण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे असून त्या ठिकाणाहून अर्ज करता येणार आहे. एवढेच नाही तर या भरती संदर्भातली अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील देण्यात आलेली आहे.
रिक्त पदाचे नाव व पदनिहाय रिक्त जागा
रेल्वे विभागाच्या माध्यमातून तब्बल 1376 पदांवर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे व यामध्ये ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट या पदाच्या एकूण चार जागा रिक्त आहेत. याशिवाय नर्सिंग सुप्रिटेंडेंट एकूण रिक्त जागा 713, डायटीशियन एकूण रिक्त जागा पाच, क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट एकूण रिक्त जागा सात,
डायलिसिस टेक्निशियन एकूण रिक्त जागा 20, फार्मसीस्ट एकूण रिक्त जागा 246, डेंटल हायजिनिस्ट एकूण रिक्त जागा तीन, हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड III एकूण रिक्त जागा 126, लॅब सुप्रीटेंडेंट ग्रेड III एकूण रिक्त जागा 27, परफ्यूजनिस्ट एकूण रिक्त जागा दोन, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II एकूण रिक्त जागा 20,
ऑक्युपेशनल थेरपीस्ट एकूण रिक्त जागा दोन, कॅथ लॅब टेक्निशियन एकूण रिक्त जागा दोन, रेडिओ ग्राफर एक्स–रे टेक्निशियन एकूण रिक्त जागा 64, स्पीच थेरपीस्ट एकूण रिक्त जागा एक, कार्डियाक टेक्निशियन एकूण रिक्त जागा चार,
ऑप्टोमेट्रीस्ट एकूण रिक्त जागा चार, ईसीजी टेक्निशियन एकूण रिक्त जागा 13, लॅब असिस्टंट ग्रेड II एकूण रिक्त जागा 94 आणि फिल्ड वर्कर एकूण रिक्त जागा 19 इत्यादी जागांचा आणि पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा किती लागेल?
रेल्वे विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये वेगवेगळ्या पॅरामेडिकल पदांसाठी असलेली वयोमर्यादा ही वेगवेगळे असून काही पदांसाठी ती किमान 18 वर्षे तर काही पदांसाठी ती 21 वर्षे आहे. जर कमाल वयोमर्यादा बघितली तर ती 33 ते 43 वर्षे इतकी आहे.
अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागेल?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता एससी, एसटी तसेच माजी सैनिक,PWBD, महिला, ट्रांसजेंडर, अल्पसंख्यांक किंवा आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच ईबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये तर उमेदवारांच्या इतर श्रेणीसाठी अर्ज शुल्क पाचशे रुपये आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
रेल्वे विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये मेडिकल डिग्री तसेच डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्राप्त केलेले असणे गरजेचे आहे. यासंबंधीची अधिकची माहिती तुम्ही वेबसाईटवरील नोटिफिकेशन मध्ये वाचू शकतात.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट
ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते rrbapply.gov.in/auth/landing या संकेतस्थळावर करू शकतात.