अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, नंदूरबार, धुळे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात गारपीटीची शक्यता; भारतीय हवामान विभागाची माहिती

Published on -

Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामान खराब आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील पिके यामुळे वाया गेली आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात गारपीट झाली आहे. यामुळे तेथील शेती पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान आज देखील नासिक जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यात हवामान खराब राहणार आहे. आज अवकाळी पाऊस आणि गारपीट देखील होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! पदवीधर उमेदवारांना ‘या’ कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

अरबी समुद्रामध्ये तयार होणारी चक्रीय वादळाची परिस्थिती आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचे मत हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. या दोन परिस्थितीमुळे आज अर्थातच 12 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात विशेषता मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाची शक्यता कायम राहणार आहे.

केवळ मध्य महाराष्ट्राच नाही तर कोकणमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 12 तारखेला मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि 13 तारखेला म्हणजेच उद्या मध्य महाराष्ट्रात काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- शिंदे सरकारने घोळ संपवला; ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय, पहा…..

या जिल्ह्यात पडणार पाऊस

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता संबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

विजा पडण्याच्या घटना अलीकडे वाढल्या असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर लगेचच सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी असे आवाहन यावेळी तज्ञ लोकांच्या माध्यमातून केले जात आहे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन देखील या कालावधीमध्ये सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवणे आवश्यक राहणार आहे. याशिवाय काढणी केलेला शेतमाल झाकून ठेवावा किंवा सुरक्षित स्थानी न्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! कर्ज घेण्यासाठी नेमका सिबिल स्कोर किती असावा?, पहा काय म्हणताय तज्ञ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!