रणवीर अलाहबादिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, फक्त 10 दिवसांत YouTube सबस्क्रायबर्समध्ये मोठी घसरण, रणवीरच्या कमाईचा आकडा कसा ?

सोशल मीडियावर सध्या हे प्रकरण सर्वाधिक चर्चेचे अन वादाचे बनले आहे अन अनेकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणामुळे पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली असल्याचे समोर आले आहे.

Tejas B Shelar
Published:

Ranveer Allahbadia News : भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागे तो गोव्याला असतांना तो आणि त्याची प्रेमिका समुद्रात बुडता-बुडता वाचले होते, तेव्हा याची मोठी चर्चा झाली होती.

पण आता तो त्याच्या एकावादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलाय. India’s Got Latent या शोमध्ये त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तो आता पुरता अडचणीत सापडला आहे. त्याच्या या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.

सोशल मीडियावर सध्या हे प्रकरण सर्वाधिक चर्चेचे अन वादाचे बनले आहे अन अनेकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणामुळे पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली असल्याचे समोर आले आहे.

महत्वाचे म्हणजे याप्रकरणानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला असून त्याचे YouTube सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत अन अखेर आता रणवीरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

पण, या वादाचा त्याच्या लोकप्रियतेवर खूपचं मोठा परिणाम झालाय, त्याच्या BeerBiceps यूट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर्स अवघ्या 10 दिवसांत प्रचंड कमी झाले आहेत.

रणवीरचे Youtube सबस्क्रायबर्स किती ?

रणवीर अलाहबादिया हा भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यूट्यूबर्सपैकी एक आहे. त्याने 2014 मध्ये BeerBiceps नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केले होते, जे सुरुवातीला फिटनेस आणि आरोग्यविषयक कंटेंटवर आधारित होते. पुढे त्याने व्यवसाय, मोटिवेशनल विषय, आणि जीवनशैलीवर आधारित कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली.

त्याच्या पॉडकास्टमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी, मोठे उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीमत्व सहभागी झालेले आहेत. आज त्याचे चॅनेल multi-platform brand बनले असून, त्याला 12 million हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

रणवीर अलाहबादियाची कमाई आणि नेट वर्थ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 पर्यंत रणवीर अलाहबादियाची एकूण संपत्ती अंदाजे ₹60 crore ($7 million) आहे. त्याचे मासिक उत्पन्न सुमारे ₹35 lakh असून, त्याच्या कमाईचे प्रमुख स्रोत YouTube जाहिराती, ब्रँड स्पॉन्सरशिप, पॉडकास्ट आणि विविध व्यावसायिक उपक्रम आहेत.
10 दिवसांत 20 लाख YouTube सबस्क्रायबर्स कमी झालेत
India’s Got Latent वरील वादग्रस्त विधानांनंतर अवघ्या 10 दिवसांत रणवीरने जवळजवळ 2 million (20 lakh) सबस्क्रायबर्स गमावले आहेत. 31 जानेवारी 2025 रोजी BeerBiceps या चॅनेलचे 10.5 million (1.05 crore) सबस्क्रायबर्स होते, तर 10 फेब्रुवारी 2025 रोजी हा आकडा 8.3 million (83 lakh) इतका झाला. ही मोठी घसरण रणवीरच्या डिजिटल प्रभावावर अन त्याच्या लोकप्रियतेवर मोठा परिणाम करत आहे.

रणवीरची माफी आणि भविष्यातील आव्हाने

वादानंतर रणवीर अलाहबादियाने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “India’s Got Latent वर मी जे बोललो ते चुकीचे होते, मला ते बोलायला नको होते.

कृपया मला माफ करा.” मात्र, प्रेक्षक त्याला माफ करणार का आणि तो पुन्हा त्याची लोकप्रियता मिळवू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हा प्रकार सोशल मीडियाच्या जगतातील एक मोठा धडा आहे—प्रसिद्धी मिळवणे सोपे असते, पण एका चुकीमुळे ती गमावण्यास वेळ लागत नाही !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe