……तर तुमचेही रेशन कार्ड रद्द होणार ! सरकारच्या नव्या निर्णयाचा अनेकांना धक्का

रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने रेशन कार्डबाबत मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे काही लोकांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. दरम्यान आता आपण कोणत्या लोकांचे रेशनकार्ड रद्द होणार हे समजून घेणार आहोत.

Published on -

Ration Card News : राज्यातील काही लोकांच्या शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने रेशन कार्ड संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे काही लोकांचे रेशन कार्ड बाद केले जाणार आहे. दरम्यान, आता आपण शासनाने नेमका काय निर्णय घेतला आहे आणि यामुळे कोणाचे रेशन कार्ड बाद होणार हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने आता वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या नागरिकांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेक कुटुंबांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.

म्हणजेच या निर्णयाचा राज्यातील अनेक कुटुंबांवर परिणाम होणार आहे, विशेषतः ज्या कुटुंबांनी अद्यापही जुन्याच शिधापत्रिका ठेवलेल्या आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय डोकेदुखी ठरू शकतो.

खरेतर, राज्यातील नागरिकांमध्ये शिधापत्रिकेचा वापर केवळ अन्नधान्याच्या सुविधेसाठी नव्हे तर अनेक सरकारी योजनांसाठीही होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत शिधापत्रिका रद्द झाल्यास संबंधित कुटुंबांपुढे नवे प्रश्न उभे राहू शकतात.

शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा हाच मोठा प्रश्न या संबंधित कुटुंबापुढे उभा राहणार आहे. खरे तर अपात्र रेशन कार्ड धारकांची ओळख पटवण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक तपासणीसह आधार कार्ड लिंकिंग सुरू केलं होतं, ज्यातून अनेक अपात्र लाभार्थ्यांचा शोध लागला.

आता पुढील टप्प्यात केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांची तपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. शासकीय व खासगी क्षेत्रातील ज्यांचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा अधिक आहे, अशांची नावे यादीतून वगळली जातील.

एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत. दरम्यान, शासनाने जिल्हा व तालुका पातळीवर यासंबंधी माहिती गोळा करून योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात असे आदेश दिले आहेत.

एकंदरीत शासनाच्या या निर्णयानंतर राज्यातील काही लोकांचे रेशन कार्ड बाद होण्याची शक्यता असते. ज्या लोकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांची शिधापत्रिका या निर्णयामुळे बाद होणार आहे.

यासाठी सरकारकडून स्पेशल मोहीम देखील राबवली जाणार आहे. त्यामुळे आता या मोहिमेनंतर किती लोकांचे रेशन कार्ड रद्द होते हे पाहणे विश्वास उत्सुकतेचे राहणार आहेत. दरम्यान जर तुमचेही उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असेल तर तुमचे सुद्धा रेशन कार्ड आगामी काळात रद्द होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe