Rats Alum Remedies : तुमच्याही घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय का? मग आज आम्ही तुम्हाला अशी एक रेमेडी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील उंदरांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर घरात उंदीर कधीच दिसणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे आजचा हा उपाय फारच स्वस्तातला आहे.
म्हणजे तुम्ही अवघ्या काही पैशांमध्ये घरातील उंदरांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकता. खरे तर घरात उंदीर वाढलेत म्हणजेच घरातील वस्तूंचे फार नुकसान होते. नोटबुक, पुस्तक वर्तमानपत्रे कपडे आणि अगदीच फळे आणि भाजीपाला सुद्धा उंदरांमुळे खराब होतात.

उंदरांमुळे घरातील धान्याचे देखील मोठे नुकसान होते. म्हणूनच घरात उंदीर वाढले की सर्वांनाच वैताग येतो. दरम्यान जर तुम्ही ही घरातील उंदरांमुळे वैतागले असाल तर तुमच्यासाठी तुरटीचा उपाय फायदेशीर ठरणार आहे. मी दहा रुपयांच्या तुरटीचा वापर करून घरातील उंदरांना दूर पळवू शकता.
खरे तर घरात उंदीर वाढलेत म्हणजेच फक्त पिंजरा लावून त्यांचा बंदोबस्त करता येणे अशक्य आहे. तुम्हाला घरात पिंजरा तर लावायचाचं आहे शिवाय तुम्हाला इतरही काही उपाय करावे लागतील जेणेकरून उंदरांचा लवकरात लवकर आणि समूळ बंदोबस्त करता येईल.
10 रुपयांच्या तुरटीमुळे उंदरांचा त्रास कायमचा संपणार
तुरटी ही एक औषधी वस्तू आहे. यामुळे आपल्यापैकी अनेकांच्या घरात तुरटी अवश्य असेल. तुरटीचा वापर अनेक औषधांमध्ये होतो. अनेकजण आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करतात तुरटीमुळे आपली त्वचा ताजी राहते.
तसेच त्वचेशी संबंधित अनेक आजार तुरटीमुळे दूर होतात. तुरटीमुळे केसांशी संबंधित समस्या सुद्धा दूर होतात. पण हीच औषधी तुरटी उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी देखील मोठी उपयोगाची आहे. असं म्हणतात की तुरटीचा गंध आणि त्याची चव उंदरांना अजिबात आवडत नाही.
यामुळे तुरटी दिसली की उंदीर आपला रस्ता बदलतात. जिथे तुरटी असते तिथे उंदीर दिसतच नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरात उंदरांचा जास्त सुळसुळाट असतो अशा ठिकाणी तुरटीची पावडर टाकू शकता किंवा तुरटीची वडी ठेवू शकता. बाजारात तुम्हाला तुरटीची पावडर आणि वडी फक्त दहा रुपयांना मिळेल.
या पदार्थांपासूनही उंदीर लांब पळतात
जर तुमच्या घरात भरपूर उंदीर असतील तर तुम्ही तुरटीचा वापर करा सोबतच तुम्ही कांद्याचा सुद्धा वापर करू शकता. कांद्याचा उग्र वास उंदरांना सहन होत नाही आणि ते कांद्याच्या वासापासून लांब पळतात.
त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातून उंदरांना पळून लावायचे असेल तर तुम्ही कांदा चिरून किंवा कांदा ठेचून ज्या ठिकाणी उंदीर जास्त दिसतात त्या ठिकाणी ठेवायला हवेत. असे केल्याने तुमच्या घरातून उंदीर कायमचे दूर होतील.
हा स्वस्तातला उपाय सुद्धा करून पहा
घरात उंदरांचा सुळसुळाट जास्तच झाला असेल तर तुम्ही एक कप साखर, एक कप बेकिंग सोडा, एक कप पीठ किंवा कॉर्नमीन आणि थोडं चॉकलेट पावडर घेऊन पेस्ट तयार करून याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करू शकता.
या गोळ्या उंदरांनी खाल्ल्यात तर उंदीर मरतात. यामुळे तुमच्या घरात ज्या ठिकाणी उंदरांचा अधिक प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी तुम्ही या गोळ्या ठेवायला हव्यात. मात्र या गोळ्या लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
या गोळ्या चुकून लहान मुलांनी खाल्ल्या तर त्यांच्या आरोग्यासाठी हे घातक ठरू शकत. पण उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी हा उपाय फारच जालीम आहे. या उपायाचा वापर करून तुम्ही घरातील उंदरांचा कायमचा बंदोबस्त करू शकता.