अंगोरा प्रजातीचा बोकड आहे जगातील सर्वात महाग! वाचाल किंमत तर डोळे होतील पांढरे, वाचा या जातींच्या शेळ्यांची वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
angora goat

भारतामध्ये शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्या दृष्टिकोनातून जर शेळ्यांच्या प्रजाती पाहिल्या तर भारतात भरपूर अशा प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती विशिष्ट राज्यांमध्ये आढळून येतात. कारण या ठिकाणचे वातावरण संबंधित प्रजातींना मानवते.

तसेच प्रत्येक प्रजातीच्या शेळी व बोकडांचे वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे  असून शारीरिक रचनेमध्ये देखील फरक आहे. यामध्ये काही जातीवंत प्रजातींच्या शेळ्या आणि बोकड यांना बाजारामध्ये विशेष मागणी असते व अशा पद्धतीची मागणी ही बकरी ईद यासारख्या सणाच्या दिवशी दिसून येते.

कारण इस्लामिक पद्धतीमध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुर्बानी साठी असलेल्या बोकडांना खूप मोठी किंमत मिळते. आपण कधी ऐकले असेल की कुर्बानी साठी काही लाखो रुपये देऊन बोकड विकत घेतले जातात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात महागडा बोकड कोणता आहे किंवा कोणत्या प्रजातीचा आहे.

विशेष म्हणजे या प्रजातीच्या बोकडाचे नाव हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंद केले गेले आहे. याच बोकडाची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण या लेखात जाणून घेऊ.

 अंगोरा प्रजातीच्या शेळ्यांची वैशिष्ट्ये

अंगोरा ही जगातील उत्तम आणि दर्जेदार अशी शेळीची जात असून या प्रजातीच्या शेळ्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाची केस असतात. तसे पाहायला गेले तर या शेळीचे पालन खास करून लोकर उत्पादनासाठी केले जाते. कारण या शेळ्यांपासून मिळणारे लोकर हे उत्कृष्ट दर्जाचे असते व त्यामुळे या शेळ्यांची किंमत देखील जास्त असते.

अंगोरा जातींच्या शेळ्या या प्रजातीमुळे किंवा त्यांच्या त्वचेवर लिहिलेल्या काही अक्षरांमुळे विशेष असतात. याचे जर आपल्याला उदाहरण घ्यायचे म्हटले म्हणजे 2023 मध्ये एका शेळीची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. कारण या शेळीच्या मालकाने त्या शेळीची किंमत तब्बल एक कोटी बारा लाखाच्या पुढे ठेवली होती व त्या शेळीचे नाव शेरू असे होते.

 किती आहे या प्रजातीच्या बोकडाची किंमत?

ब्रँड नावाचा हा बोकड जगातील सर्वात जास्त किमतीला विकला गेला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार बघितले तर या बोकडाची किंमत 82 हजार 600 अमेरिकन डॉलर इतकी आहे. किंमत भारतीय चलनामध्ये किंवा रुपयांमध्ये बघितली तर ती अंदाजे 69 लाख रुपये इतकी आहे.

अंगोरा जातीची ही बकरीची ब्रिटनमध्ये सर्वाधिक किंमत विकली गेली होती व ही किंमत 1985 मध्ये दिली गेली होती. यावरून आपल्याला अंदाज येतो की 1985 मध्ये 70 लाख रुपये या प्रजातीच्या बोकडाची किंमत होती तर आज हा बोकड कोटी रुपये किमतीमध्ये विकला जात असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe