कमी किंमत आणि चांगले मायलेज देणारी सीएनजी कार घेण्याचा विचार आहे का? ‘या’ 3 सीएनजी कार आहेत जबरदस्त मायलेज देणाऱ्या, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
tata punch cng car

 

पेट्रोल आणि डिझेल पर्याय असलेल्या कार विकत घेण्यापेक्षा आता बरेचजण सीएनजी कार विकत घेण्याचा विचार करतात. तसेच अनेक कार उत्पादक कंपन्यांनी पेट्रोल मॉडेल सोबतच सीएनजी कार मॉडेलची देखील निर्मिती केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कंपन्यांच्या उत्तम अशा सीएनजी कार सध्या बाजारात मिळू शकतात.

परंतु यामध्ये प्रत्येक व्यक्ती कार घेताना आपला स्वतःचा बजेट पाहतो व त्या बजेटमध्ये चांगले वैशिष्ट्य आणि मायलेज देणारे कार मिळेल का याच्या शोधात प्रामुख्याने असतो. त्यामुळे तुम्हाला देखील सीएनजी कार कमीत कमी बजेटमध्ये हवी असेल व चांगले मायलेज असणारी पाहिजे

असेल तर तुम्ही बाजारपेठेत असलेल्या लो बजेट सेगमेंट मधील काही सीएनजी कार विकत घेण्याचा विचार करू शकतात. यातील कार मायलेजच्या बाबतीत टॉप समजल्या जातात. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही सीएनजी बजेट कार बद्दल माहिती घेणार आहोत. त्यांची किंमत आठ लाख रुपयापेक्षा देखील कमी आहे.

 या आहेत कमी किमतीतील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कार

1- मारुती सुझुकी वॅगनआर जर तुम्हाला सीएनजी पावरट्रेन असलेली कार खरेदी करायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकीची वॅगनार या कारचा विचार करू शकतात. ही कार भारतामध्ये सर्वात जास्त विकली जाणाऱ्या हॅचबॅक कारपैकी एक असून मारुती सुझुकीच्या वॅगनआर सीएनजी ची सुरुवातीची किंमत सहा लाख 45 हजार रुपये आहे व ही कार एक किलो सीएनजीमध्ये साधारणपणे 33.47 किलोमीटर ऍव्हरेज देते असा कंपनीचा दावा आहे.

2- मारुती सुझुकी अल्टो K10- भारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार पैकी ही एक असून ग्राहकांच्या पसंतीची कार म्हणून देखील ओळखली जाते. भारतामध्ये या कारच्या आतापर्यंत 50 लाख पेक्षा जास्त युनिटची विक्री केली गेली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 74 हजार रुपये आहे व कंपनीच्या दाव्यानुसार बघितले तर मारुती सुझुकी अल्टो  K10 एक किलोग्रॅम सीएनजी मध्ये 33.85 किलोमीटर मायलेज देते.

3- टाटा पंच टाटा मोटरची ही कार असून सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. नुकतीच या कारची  B-NCAP च्या माध्यमातून क्रॅश टेस्ट घेण्यात आली व यामध्ये या कारणे पूर्ण पाच गुण मिळवले आहेत. टाटा पंचची एक्स शोरूम किंमत सात लाख 23 हजार रुपये असून कंपनीच्या दाव्यानुसार बघितले तर ही कार एक किलोग्रॅम सीएनजी मध्ये 26.99 किलोमीटरचे मायलेज देते.