Srikanth Bolla Success Story: श्रीकांत बोल्ला यांच्यावर आधारित आहे नुकताच ट्रेलर रिलीज झालेला ‘श्रीकांत’ सिनेमा! कोण आहेत नेमके श्रीकांत बोल्ला? वाचा माहिती

Published on -

Srikanth Bolla Success Story:- व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जे काही गुण आवश्यक असतात किंवा लागणारा पैसा हवा असतो अगदी त्यासोबत शारीरिक दृष्ट्या आरोग्य देखील सुदृढ असणे खूप गरजेचे असते. व्यक्तीचे शरीर जर  सुदृढ आणि निरोगी असेल तर त्याचे मन देखील तेवढेच उत्साही आणि निरोगी राहते व ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती प्रभावीपणे काम करत

परंतु जर व्यक्ती दिव्यांग असेल तर मात्र बऱ्याच प्रमाणात मर्यादा येतात. परंतु तरीदेखील असे अनेक लोक आहेत की त्यांनी त्यांच्या शारीरिक दिव्यंगत्वावर मात करत अनन्यसाधारण असे यश प्राप्त केलेले आहे. या यशवंतामध्येच आपल्याला श्रीकांत बोल्ला या व्यवसायिकाचे उदाहरण घेता येईल.

यांच्यावर नुकताच राजकुमार रावच्या श्रीकांत चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज करण्यात आला असून यामध्ये राजकुमार राव यांनी श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारलेली आहे. त्यामुळे या लेखात आपण श्रीकांत  बोल्ला नेमके कोण आहेत व त्यांनी काय काम केले आहे? त्याबद्दलची माहिती घेऊ.

 श्रीकांत यांची यशोगाथा

श्रीकांत बोल्ला यांचा जन्म 1991 यावर्षी आंध्र प्रदेश राज्यातील मच्छलीपट्टणम या ठिकाणी झाला. एकंदरीत त्यांचे बालपण पाहिले तर ते अनेक हलाखीच्या परिस्थितीमधून आणि संकटातून पार पडले. जन्मता डोळ्यांनी अंध असल्यामुळे त्यांना जग पाहता आले नाही.

त्यामुळे या दिव्यांगत्वामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला व अक्षरशः शिक्षण घेण्यासाठी देखील त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. त्यांची जर शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर मोठ्या  कष्टाने आणि न्यायालयात लढा देत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले व बारावी मध्ये 98 टक्के गुण मिळवले.

त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले व अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले.विशेष म्हणजे त्या ठिकाणी पदवी प्राप्त करणारा पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टीहीन विद्यार्थी म्हणून श्रीकांतचा गौरव झाला. त्यामुळे अमेरिकेने त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्यांना दिली. परंतु मनामध्ये काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न असल्यामुळे त्यांनी ते काम नाकारले.

 अशा पद्धतीने झाली व्यावसायिक आयुष्याला सुरुवात

जेव्हा श्रीकांत यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न फक्त सोळाशे रुपये इतके होते व अभ्यासासाठी त्यांची धडपड अशा परिस्थितीत सुरू राहिली व संघर्ष यशस्वी झाला. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरी न करता एखादा व्यवसाय करण्याचे ठरवले व त्या व्यवसायामध्ये इतर दिव्यांगांना काम करण्याची संधी द्यावी असा विचार त्यांच्या मनामध्ये आला व ते अमेरिकेतून भारतात परतले.

साधारणपणे 2011 मध्ये श्रीकांत ने बहु विकलांग मुलांसाठी समनवाई केंद्र सुरू केले व त्यामध्ये त्यांनी दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर 2012 मध्ये श्रीकांतने बोलंट इंडस्ट्री सुरू केली. ही कंपनी नैसर्गिक पाने आणि पुनर्नविनीकरण केलेल्या कागदापासून इको फ्रेंडली डिस्पोजेबल उत्पादने तयार करते. या कंपनीच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार देखील दिला जातो.

विशेष म्हणजे श्रीकांत यांच्या या बोलंट कंपनीचे बहुसंख्य कर्मचारी हे अपंग आहेत. त्यांची ही व्यवसायाची कल्पना पाहून अनेक गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित झाले व त्यांच्या या व्यवसायाला निधी दिला व आज श्रीकांत बोल्ला यांची ही कंपनीची किंमत सुमारे पाचशे कोटी रुपये इतकी आहे.

त्यांच्या या अनन्यसाधारण यशस्वी कार्याचा गौरव म्हणून जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर 2017 मधील फोर्ब्स 30 अंडर 30 एशिया यादीमध्ये देखील श्रीकांत यांना स्थान मिळाले. यावेळी ते आशियामधून निवड झालेल्या तीन भारतीयांपैकी एक होते.

एवढेच नाही तर त्यांना सीआयआय एमर्जिंग एंटरप्रेनोर ऑफ द इयर 2016, ECLIF मलेशिया एमर्जिंग लीडरशिप अवॉर्ड असे अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. तसेच श्रीकांत यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडरच्या यादीमध्ये देखील 2021 मध्ये समावेश करण्यात आला होता. नुकताच श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीकांत’ हा चित्रपट तयार करण्यात आला असून तो दहा मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News