भारताचे स्मार्टफोन बाजारपेठ बघितली तर जगभरातील अनेक कंपन्यांच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेली उत्कृष्ट असे स्मार्टफोन आपल्याला दिसून येतात. अगदी काही हजारापासून ते लाखो रुपये किमतीचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांकरिता उपलब्ध असून ग्राहकांना देखील यामुळे त्यांचा बजेटमधील स्मार्टफोन घेणे शक्य होते.
तसेच आता सणासुदीचा कालावधी सुरू असल्यामुळे बऱ्याच जणांकडून या कालावधीत नवीन स्मार्टफोन विकत घेण्याला प्राधान्य दिले जाते.त्यामुळे अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कमी किमतीतले आणि उत्कृष्ट फीचर्स असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आलेले आहेत.

अगदी या अनुषंगाने जर बघितले तर चायनीज टेक कंपनी रियलमीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन रियलमी P1 स्पीड लॉन्च केला असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत 50 मेगापिक्सलचा कॅमेरा व बरेच असे उत्कृष्ट फीचर्स मिळणार आहेत.
या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 45W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे व या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 14 वर आधारित मीडियाटेक डायमेन्शन 7300 चिपसेट देखील दिला आहे. याशिवाय अनेक उत्कृष्ट अशी वैशिष्ट्ये यामध्ये समाविष्ट आहेत.
कसा आहे डिस्प्ले?
या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.67 इंच फुल एचडी +AMOLED डिस्प्ले दिला असून त्याचा कमाल ब्राईटनेस 2000 नीट इतका आहे. तसेच त्याचे रिझोल्युशन 2400×1080 पिक्सेल इतके आहे.
कॅमेरा कसा आहे?
रियलमीने या स्मार्टफोनमध्ये उत्तम फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करिता मागच्या पॅनलवर 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
कसा आहे प्रोसेसर?
या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित रियलमी UI 5.0 ऑपरेटिंग सिस्टम दिली असून यात मीडियाटेक डायमेन्शन 7300 प्रोसेसर आहे.
कशी आहे बॅटरी?
या स्मार्टफोनमध्ये नारझो 70 टर्बोमध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे.
किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
भारतीय बाजारपेठेत कंपनीने दोन रॅम आणि दोन स्टोरेज पर्यायामध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याची सुरुवातीची किंमत 15999 इतकी आहे.
ज्याला कुणाला खरेदी करायचा असेल ते कंपनीच्या वेबसाईट वरून खरेदी करू शकतात किंवा ई-कॉमर्स वेबसाईट वरून देखील खरेदी करू शकतात. कंपनी त्याच्या दोन्ही स्टोरेज व्हेरिएंटवर दोन हजार रुपयांची सूट देत आहे.