रेडमीने लॉन्च केला भन्नाट वैशिष्ट्य असलेला 5G स्मार्टफोन; किंमत पहाल तर म्हणाल वाव! वाचा या फोनची वैशिष्ट्ये

Published on -

स्मार्टफोन आता प्रत्येकाची गरज झाली असून अगदी शाळकरी मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींच्या हातामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन दिसून येतात. आपल्याला माहित आहे की, स्मार्टफोन काही हजार रुपये पासून तर लाखो रुपये पर्यंत मिळतात व त्यामध्ये किमतीनुसार वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे असतात.

भारतामध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांचे फोन बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतात. ज्याला कुणाला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो त्या प्रत्येकाची इच्छा असते की कमीत कमी परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगली वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन मिळावा व त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण प्रयत्न करत असते.

याच प्रकारे तुम्हाला देखील परवडणाऱ्या किमतींमध्ये उत्तम वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली असून रेडमीने नऊ जुलै 2024 रोजी भारतीय बाजारामध्ये ‘रेडमी 13 5G’ स्मार्टफोन लॉन्च केला असून हा अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

 रेडमीने लॉन्च केला रेडमी 13 5G स्मार्टफोन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिनी इलेक्ट्रिक कंपनीची उप कंपनी ब्रँड रेडमीने नऊ जुलै रोजी भारतीय बाजारामध्ये रेडमी 13 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये ग्राहकांना हा फोन मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक महत्वाचे वैशिष्ट्ये देण्यात आली असून ग्राहकांसाठी हा एक फायद्याचा फोन ठरणार आहे. कंपनीच्या मते स्मार्टफोन सेगमेंटमध्ये रेडमी 13 हा एकमेव 5G स्मार्टफोन आहे.

 काय आहेत या स्मार्टफोनमध्ये वैशिष्ट्ये?

जर आपण या स्मार्टफोनमध्ये असलेली वैशिष्ट्ये पाहिली तर यामध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला असून त्यासोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चार जनरेशन दोन चिपसेट किंवा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रेडमी कंपनीच्या स्वतःच्या असलेल्या हायपर ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

तसेच या स्मार्टफोनमध्ये 33W चार्जिंग सपोर्टसह 5530mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. तसेच रेडमी कंपनीने या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल दावा केला आहे की,रेडमी 13 5G चा डिस्प्ले सेगमेंट मधील सर्वात मोठा डिस्प्ले असून हा स्मार्टफोन ऑर्किड पिंक, हवाईयन ब्लू आणि ब्लॅक डायमंड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनचे स्टोरेज पाहिले तर यामध्ये सहा जीबी+ 128 जीबी आणि आठ जीबी+ 128 जीबी स्टोरेज पर्याय देण्यात आलेला आहे.

 किती आहे या स्मार्टफोनची किंमत?

रेडमीने लॉन्च केलेल्या रेडमी 13 5G स्मार्टफोनच्या सहा जीबी+ 128 जीबीची किंमत 13999 रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe