Refrigerator Tips: ‘या’ घरगुती उपायाने तुमच्या फ्रिजमध्ये कधीच नाही होणार बर्फ जमा! विजबिल देखील येईल कमी

Published on -

Refrigerator Tips:- घरामध्ये आपण अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरतो व यामध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या किंवा काही नको असलेल्या गोष्टी घडून येत असतात. जर आपण स्वयंपाक घराचा देखील विचार केला तरी अनेक छोट्या छोट्या समस्या उद्भवतात व या समस्या मिटाव्या त्याकरता आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो.

यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर गॅसचे बर्नर काळे होणे, वापरात असलेल्या प्लास्टिकच्या बादल्या देखील काळ्या होणे इत्यादी समस्या आपल्याला दिसून येतात व या समस्या पासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो. परंतु कुठलाही फायदा होताना दिसून येत नाही.

हीच बाब जर आपण घरातील फ्रिजच्या बाबतीत घेतली तर फ्रिजमध्ये देखील बऱ्याचदा  भांडे चिकटतात किंवा त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बर्फ गोळा होतो. हा बर्फ काही केल्या लवकर वितळत नाही. त्याकरता देखील आपल्याला बऱ्याचदा फ्रिज बंद करून ठेवावे लागते. जेणेकरून जमा झालेला हा बर्फ वितळेल हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु असे केल्याने देखील बऱ्याचदा बर्फ वितळत नाही. त्यामुळे आपण एक छोटासा आणि घरगुती असा महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे घरातील फ्रिजमध्ये बर्फ जमाच होणार नाही.

 बटाट्याचा वापर केल्याने फ्रीजमध्ये बर्फ नाही होणार जमा

याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी बटाटा स्वच्छ धुऊन घ्यावा लागेल व त्याचे दोन भाग करून घ्यावेत. त्यानंतर तुमच्या फ्रीजमध्ये जो काही जमा झालेला बर्फ आहे त्याला वितळून घ्यावे व पूर्ण बर्फ साफ करून घ्यावा. बर्फ साफ झाल्यानंतर तुम्ही जो काही बटाटा कापला असेल त्याची तुकडे घेऊन ते तुकडे संपूर्ण फ्रिजमध्ये व्यवस्थितपणे घासून घ्यावे.

फ्रिजचा कुठलाही कोपरा सुटणार नाही याची काळजी घ्यावी व बटाट्याचा तुकडा घासावा. अशा पद्धतीने केलेली ही ट्रिक खूप फायद्याची ठरते व यामुळे फ्रिजरमध्ये बर्फ जमा होणार नाही. याव्यतिरिक्त बऱ्याच जणांना दिवसातून बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त वेळ फ्रिज उघडण्याची व लावण्याची सवय असते.

यामुळे देखील गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा होतो. फ्रीजमध्ये मॉइश्चर होऊ नये यासाठी दिवसातून कमीत कमी वेळा फ्रिज उघडावे. कारण जेव्हाही आपण फ्रीज उघडतो तेव्हा बाहेरील गरम हवा आत जाते व आतील थंड हवेत मिसळून त्याचे मॉइश्चर तयार होते व बर्फात रूपांतर होते. त्यामुळे कमीत कमी वेळा फ्रीज ओपन करावे.

 फ्रिजचे टेंपरेचर व्यवस्थित सेट करणे

फ्रिजचे तापमान व्यवस्थित सेट करण्यावर देखील फ्रीजमध्ये जमा होणाऱ्या बर्फाचे प्रमाण अवलंबून असते. तुमच्या फ्रिजरमध्ये देखील जास्त बर्फ जमा होत असेल तर फ्रिजचे तापमान 18 डिग्री फॅरेनहाईट वर सेट करणे गरजेचे आहे. यापेक्षा जास्त तापमान सेट केले असेल तर फ्रिजर चे तापमान कमी करणे अथवा सेट करणे गरजेचे आहे. नाहीतर फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ तयार होतो.

 फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवू नये

आपल्यापैकी बऱ्याच जणांना फ्रिजमध्ये नको त्या किंवा गरजेपेक्षा जास्त पदार्थ किंवा वस्तू ठेवण्याचे सवय असते. परंतु फ्रीजमध्ये जास्तीचा सामान ठेवणे कधीही टाळणे गरजेचे आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी आठवड्यातून तीन ते चारदा फ्रिजची साफसफाई करणे गरजेचे आहे. यासाठी सोपी पद्धत म्हणजे सगळ्यात आधी अगोदर फ्रिज मधील सर्व खाद्यपदार्थ काढून घ्यावेत व त्या आईस बॉक्समध्ये ठेवून द्यावेत व एक तासासाठी फ्रिजर बंद करावा व नंतर त्याची स्वच्छता करावी.

अशा पद्धतीने अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे देखील फ्रिज मधील बर्फ जमा होण्यास अटकाव होऊ शकतो व या सगळ्या गोष्टींचा फायदा विज बिल कमी होण्यावर देखील होत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!