Crop Damage Compensation:- महाराष्ट्र मध्ये यावर्षी सगळीकडे चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला होता व काही ठिकाणी अतिवृष्टी व व परिस्थिती निर्माण झाली होती व यामुळे बऱ्याच प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. साधारणपणे ही परिस्थिती जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत उद्भवली होती.
झालेल्या या अतीवृष्टी मुळे व पूरस्थितीमुळे शेती पिकांच्या अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली जात होती व त्या अनुषंगाने आता राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत नुकसान झाले होते
अशा राज्यातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांच्या मदत निधी वितरणाला आता मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच पुणे व नागपूर या चार विभागातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे आता ही आर्थिक मदत मिळणार असल्याने खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाचे म्हणजे एक जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने म्हणजेच दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंत ही मदत शेतकऱ्यांना मिळणार असून ती डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वितरित करण्यात येणार आहे.
या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल लाभ
यामध्ये विभागनिहाय बघितले तर छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली, जालना तसेच परभणी, बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक विभागातील नाशिक, धुळे, अहिल्यानगर, नंदुरबार तसेच जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील वर्धा,
भंडारा, नागपूर तसेच गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पुणे विभागातील सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागनिहाय निधी बघितला तर छत्रपती संभाजी नगर विभागाकरिता 2738 कोटी 62 लाख रुपये,
नागपूर विभागासाठी 111 कोटी 41 लाख रुपये, नासिक विभागाकरिता आठ कोटी 94 लाख रुपये आणि पुणे विभागासाठी 61 कोटी 60 लाख रुपयांचा निधी वाटपास मंजुरी देण्यात आली आहे.