Vastu Tips:- प्रत्येकाचे स्वप्न असते किंवा प्रत्येकाची इच्छा असते की स्वतःचे घर असावे व त्याकरिता प्रत्येकजण प्रयत्न करते व स्वतःच्या घराचे बांधकाम किंवा घराची खरेदी केली जाते. परंतु जेव्हाही घराचे बांधकाम केले जाते तेव्हा प्रत्येक जण वास्तुशास्त्राचा विचार करूनच घराचे बांधकाम करत असतात.
इतकेच नाहीतर फ्लॅट खरेदी करायचा असेल तरी देखील वास्तु नियम लक्षात घेऊन खरेदी केला जातो व असे करणे हे खूप फायद्याचे ठरते. वास्तू नियम पाळून जर घराचे बांधकाम किंवा घराची खरेदी केली असेल तर घरामध्ये आनंदी आनंदाचे वातावरण राहते व सुख-समृद्धी नांदते.
या अनुषंगाने तूम्हाला देखील तुमच्या स्वप्नातील घर बांधायचे असेल किंवा फ्लॅट किंवा घर विकत घ्यायचे असेल तर वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रसंगी कोणते नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे आपण या लेखात थोडक्यात समजून घेऊ.
घराचे बांधकाम किंवा घराची खरेदी करताना हे वास्तू नियम पाळा
1- घराचे बांधकाम करताना किंवा घर खरेदी करताना दिशा पहावी- तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल किंवा फ्लॅट किंवा घर खरेदी करायचे असेल तर त्या अगोदर दिशा पाहणे खूप गरजेचे ठरते.
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घराचे मुख्य प्रवेशद्वाराची दिशा पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला असावे. त्यामुळे घराची प्रगती होत राहते व घरात आनंदी आनंदाचे वातावरण राहते.
2- सूर्यप्रकाशाचा विचार करणे- वास्तुशास्त्रानुसार बघितले तर सकाळ आणि संध्याकाळी सूर्यप्रकाश घरावर पडेल अशा पद्धतीने घराची रचना असावी.
अशाप्रकारे घरावर सूर्यप्रकाश पडला तर कुटुंबात आनंदाचे वातावरण असते व घरासाठी ते खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घर बांधताना किंवा घर खरेदी करताना ही गोष्ट देखील लक्षात ठेवावी.
3- घराचा आकार- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घर खरेदी करायचे असेल किंवा घराचे बांधकाम करायचे असेल तर त्या घराच्या आकाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घर खरेदी करताना किंवा घर बांधताना त्या घराचा आकार नेहमी आयताकृती आणि चौकोनी असणे गरजेचे आहे.
4- बेडरूम आणि किचनची दिशा- घर बांधताना किंवा घराची खरेदी करताना त्या घरातील बेडरूम आणि किचनची दिशा पाहणे गरजेचे आहे. वास्तु नियमानुसार बघितले तर बेडरूम दक्षिण- पश्चिम दिशेला असावे आणि किचन हे आग्नेय दिशेला असावे.
5- देवघर किंवा पूजा घरची दिशा- घराचे बांधकाम करताना किंवा घर खरेदी करताना त्या घरामध्ये असलेले देवघर किंवा पूजेची खोली योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरातील मंदिर किंवा पूजेची खोली नेहमी उत्तर-पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही किंवा या माहितीचे समर्थन करत नाही.)