रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
RBI Recruitment 2023

Reserve Bank Of India Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

कारण की, रिझर्व बँक ऑफ इंडिया ने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गमित केली आहे. यानुसार RBI च्या विविध विभागामध्ये ग्रेड बी ची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रिया अंतर्गत आरबीआय मध्ये रिक्त असलेली ग्रेड बी ची 291 पदे भरली जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- 12वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, 21 मे पर्यंत इथं करा अर्ज

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल, अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआर, अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएम या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल २२२ पदे,

अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआर ३८ पदे,

अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएम ३१ पदे अशा एकूण 291 रिक्त पदाच्या जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जातील.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ भागात पुन्हा वादळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा 

अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान पदवी उत्तीर्ण असणे जरुरीचे आहे. तसेच अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआर आणि डीएसआईएम या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे जरुरीचे आहे.

शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा मात्र अधिसूचना वाचावी लागणार आहे. 21 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी पात्र राहणार असून आरक्षित उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी सुट राहील.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन सादर करू शकतील.

भरतीची जाहिरात कुठे पाहणार

https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4259 या लिंक वर जाऊन सदर पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! तलाठी भरती केव्हा होणार? महसूलमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe