दीपिका पादुकोणच्या ‘कंडोम’विषयी केलेल्या वक्तव्यामुळे भडकले होते ऋषी कपूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सध्या लॉक डाऊनमुळे सर्वच सेलिब्रेटी घरातच आहेत. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावरील चर्चेने सेलिब्रेटींशी निगडीत काही स्टोरीज व्हायरल होत आहे. असाच एक दीपिका पादुकोण व सोनम कपूरचा किस्सा व्हायरल होतो आहे.

दीपिका पादुकोण व सोनम कपूर या दोघी करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विद करणमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तिथे त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून ऋषी कपूर दीपिका पादुुकोण व सोनम कपूरवर इतके भडकले होते की त्यांच्या करियर व क्लासवर सवाल उपस्थित केला होता.

झालं असं की, टॉक शो कॉफी विद करणमध्ये या दोन अभिनेत्री गेल्या होत्या. या शोमध्ये करणने दीपिकाला विचारले होते की, तू रणबीर कपूरला गिफ्टमध्ये काय देऊ इच्छिते.

त्यावर दीपिका म्हणाली होती की, रणबीरला मी एक कंडोमचे पॅकेट गिफ्ट म्हणून देईन. कारण तो त्याचा जास्त वापर करतो. सोबतच दीपिका हेही म्हणाली की, रणबीरने कोणत्यातरी कंडोम कंपनीची जाहिरातीत काम केले पाहिजे.

तर याच शोमध्ये अनिल कपूरची मुलगी सोनमने रणबीरसाठी म्हटले होते की, तो माझा चांगला मित्र आहे. पण मला माहित नाही की, तो एक चांगला बॉयफ्रेंड आहे की नाही. मी रणबीरला काही दिवसांपासून ओळखते आहे.

एक मित्र म्हणून माझा अर्थ हा आहे की दीपिका त्याच्यासोबत इतका काळ चांगली राहिली आहे. ऋषी कपूर सोनम कपूर व दीपिका पादुकोणचे हे बोलणं ऐकून खूप भडकले होते.

एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, दोघांचे म्हणणं ऐकून ते त्यांचा क्लास दाखवतात. त्या दोघांनी अशा गोष्टींपेक्षा त्यांच्या करियरवर जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे.इतकंच नाही तर ते ही म्हणाले की या शोमध्ये दोघींना त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळे बोलवले होते. कारण त्या दोघींनी अद्याप काहीच प्रतिष्ठा मिळवलेली नाही. असे ते म्हणाले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment