Royal Enfield : 30 वर्षांपूर्वीची रॉयल एनफिल्ड बुलेटची किंमत पहाल तर नाही बसणार विश्वास, वाचा बुलेटचा इतिहास

Updated on -

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड बुलेट ही सगळ्यांची पसंतीची बाईक असून या गाडीचा भारदस्तपणा बाईक रायडिंग करणाऱ्याला अप्रतिम असा अनुभव प्रदान करतो.आपल्यापैकी बऱ्याच जणांची बुलेट घेण्याची इच्छा असते. परंतु सध्या रॉयल एनफिल्ड बुलट च्या किमती पाहिल्या तर त्या  खूप जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच ही बाईक घेणे परवडत नाही. रॉयल एनफिल्डच्या बुलेट ला बाईकचा बादशहा म्हटले जाते. या बाईकला कायमच प्रचंड प्रमाणात मागणी आहे.

खास करून तरुणांमध्ये या बाईकची क्रेझ दिसून येते. जरा आता या बाईकची किंमत पाहिली तर ती दीड ते तीन लाखांच्या दरम्यान आहे. परंतु रॉयल एनफिल्डच्या बुलेटची मागील तीस ते पस्तीस वर्षाअगोदरची किंमत जर पाहिली तर तुमचा विश्वास बसणार नाही इतकी कमी होती. या पार्श्वभूमीवर या लेखात आपण रॉयल एनफिल्ड बुलेट बाईकचा इतिहास आणि तिची किंमत जाणून घेणार आहोत.

 1986 मध्ये इतकी होती बुलेटची किंमत

सध्या सोशल मीडियावर १९८६ या वर्षात खरेदी केलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट 350cc या बाईकचे बिल व्हायरल होत आहे. हे बिल पाहिल्यानंतर बुलेटची किंमत पाहून व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसणार नाही तर नवलच. सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या या बिलवर रॉयल एनफिल्ड बुलेटची ऑन रोड किंमत 18,700 रुपये इतकी आहे. 1986 मध्ये या बाईकला फक्त एनफिल्ड बुलेट असे म्हटले जायचे.

 रॉयल एनफिल्ड सर्वप्रथम केव्हा झाली होती लाँच?

रॉयल एनफिल्ड चे सगळ्यात प्रसिद्ध असलेले मॉडेल बुलेट 350 हे 87 वर्षापूर्वी 1931 मध्ये बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली होती. तेव्हा या बाईकचे नाव फक्त एनफिल्ड बुलेट असे होते. त्या कालावधीमध्ये देखील ही बाईक विश्वसनीतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते.

भारतीय सेना या बाईकचा उपयोग सीमावर्ती भागामध्ये गस्त घालण्यासाठी करत असे.1931 यावर्षी ब्रिटनमध्ये ही लॉन्च करण्यात आलेली होती. त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी म्हणजेच 1951 वर्षी ती भारतात लॉन्च करण्यात आली. तेव्हा देखील ही बाईक  दुचाकी प्रेमींची खास पसंती होती.

जर एनफिल्ड बुलेट चा विचार केला तर इतर बाईकच्या तुलनेत खूप दीर्घ कालावधीपर्यंत ती मार्केटमध्ये टिकून आहे. बुलेटची निर्मिती करणाऱ्या रॉयल एनफिल्ड या कंपनीचा विचार केला तर ही कंपनी अगोदर लॉन मधील गवत कापण्यासाठी उपयुक्त असलेली उपकरणे तयार करत होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe