Salary Advance Loan: तुम्हाला माहित आहे का सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजे नेमके काय? किती आकारले जाते व्याज? केव्हा मिळतात पैसे?

तुम्ही जर पगारदार नोकर असाल तर त्यावर तुम्हाला सॅलरी ऍडव्हान्स लोन देखील मिळू शकते. अशा पद्धतीचे कर्ज तुम्हाला सहजपणे मिळते. अनेक संस्था अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या अर्जावर ऍडव्हान्स पगार देतात.

Published on -

Salary Advance Loan:-जेव्हा आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक गरज उद्भवते व त्यावेळेस अचानक पैशांची गरज भासते तेव्हा आपण मित्र किंवा नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेतो किंवा कर्जरूपाने असे पैसे घेत असतो.

परंतु या पद्धतीने जर पैसे उपलब्ध झाले नाही तर बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जरुपाने पैसा उभारला जातो व उद्भवलेली पैशाची गरज भागवली जाते.

यामध्ये जास्त करून पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु तुम्ही जर पगारदार नोकर असाल तर त्यावर तुम्हाला सॅलरी ऍडव्हान्स लोन देखील मिळू शकते.

अशा पद्धतीचे कर्ज तुम्हाला सहजपणे मिळते. अनेक संस्था अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या अर्जावर ऍडव्हान्स पगार देतात. परंतु या ठिकाणी आपण बँकेने दिलेल्या सॅलरी ॲडव्हान्स लोनबद्दल माहिती घेणार आहोत. परंतु यामध्ये बँका आणि इतर फायनान्स कंपन्या तुम्हाला सॅलरी ऍडव्हान्स देतात.

 सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजेच पगार आगाऊ कर्ज म्हणजे काय?

सॅलरी ऍडव्हान्स लोन भारतातील नोकरदार लोकांसाठी उपलब्ध असलेल्या कर्जाचा प्रकार असून पर्सनल लोन व्यतिरिक्त पगाराच्या आगाऊ कर्जावरील व्याजदराची गणना मासिक किंवा अगदी दररोज केली जाते. या प्रकारच्या कर्जाचे व्याजदर आणि अटी व शर्ती प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या असू शकतात.

सॅलरी ऍडव्हान्स लोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे लोन काही मिनिटात ते काही तासात आपल्याला मिळते. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत सॅलरी ऍडव्हान्स लोनमधून मोठा दिलासा मिळतो.

भारतामध्ये अनेक वित्तीय कंपन्या आणि बँका आहेत ज्या पगाराची आगाऊ कर्जे म्हणजेच सॅलरी ऍडव्हान्स लोन देतात. तुमचे पगार खाते असलेल्या बँकेतून तुम्ही सहजपणे अशा प्रकारचे कर्ज घेऊ शकता.

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अर्जासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही.

 किती व्याज आकारले जाते इतर महत्त्वाच्या अटी?

जर याबद्दल उपलब्ध माहिती बघितली तर अर्ली सॅलरी, लोन टॅप तसेच कॅश कुमार, क्विक क्रेडिट, फ्लेक्स सॅलरी आणि क्रेडिट बाजार या महत्त्वाच्या वित्तीय कंपन्या देखील सॅलरी ॲडव्हान्स लोन देतात.

साधारणपणे या कर्जावर मासिक 2.5% व्याज भरावे लागते. या माध्यमातून कमीत कमी आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त एक लाख रुपये कर्जाची रक्कम मिळते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News