Sambhaji Nagar To Bangalore Flight : छत्रपती संभाजी नगरवासियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी तब्बल पाच वर्षांपासून बंद पडलेली मुंबई पुणे विमान सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान आता छत्रपती संभाजी नगर ते बेंगलोर विमानसेवा पूर्ववत होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, जवळपास तीन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर आणि बेंगलोर दरम्यान असलेली विमानसेवा बंद करण्यात आली आहे. कोरोना कालावधीपासून बंद झालेली ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू व्हावी अशी मागणी प्रवाशांची होती. वास्तविक कोरोना काळात जवळपास सर्वच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या.
कोरोनामुळे लॉकडाऊन होते परिणामी विमान सेवा बंद झाल्या होत्या. यानंतर कोरोनाचा शिरकाव कमी झाल्यानंतर, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील विमानसेवा पूर्ववत करण्यात आल्या. मात्र छत्रपती संभाजी नगर ते बेंगलोर विमान सेवा काही पूर्ववत होऊ शकली नाही.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरात ‘या’ दिवसापासून होणार मोठी वाढ,…
यामुळे प्रवाशांना बेंगलोरला प्रवास करताना मोठ्या संकटांचा सामना करावा लागायचा. मात्र शहरातून बेंगलोरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता ही सेवा पुन्हा बहाल करण्यात येणार आहे. म्हणजे आता तीन वर्षांपासून खंडित झालेली ही विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय झाला आहे. इंडिगो एअरलाइन्स या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा दिली जाणार आहे. इंडिगोने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तीन वर्षांपासून बंद असलेली बेंगलोर ते छत्रपती संभाजीनगर ही विमानसेवा आता सुरू होणार आहे.
आजपासून म्हणजे 28 मार्च 2023 पासून ही बंद पडलेली विमानसेवा सुरू होणार असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. निश्चितच हा उद्योजकांसाठी तसेच कामानिमित्त बेंगलोरला जाणाऱ्या नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. या निर्णयाचा निश्चितच प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. आता पुन्हा एकदा ही दोन्ही शहरे परस्परांना थेट हवाई मार्गे जोडली जाणार आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘त्या’ प्राध्यापकांच्या वेतनवाढीचा प्रश्न लागला मार्गी, शासन निर्णय जारी; आता…
यामुळे बेंगलोरहुन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील फायदा होणार आहे. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान असलेली कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत सुधारणार आहे. पण या निमित्ताने आणखी एक वाद पेटत आहे. वास्तविक या दोन्ही शहरादरम्यान रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची आहे. पण यावर कोणता सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने प्रवाशांनी यावेळी आपली खंत बोलून दाखवली आहे.
मात्र लवकरच यावर देखील निर्णय घेतला जाईल आणि या दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना देखील दिलासा दिला जाईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. दरम्यान आज पासून सुरू होणारी ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे आठवड्यातील 3 दिवस अविरतपणे सुरू राहणार आहे.
हे पण वाचा :- शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ