Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा महामार्ग अर्थातच समृद्धी महामार्ग कायमच चर्चेत राहतो. या महामार्गाचा पहिला टप्पा नुकताच म्हणजेच गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यान असलेला 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून यामुळे विदर्भवासियांना शिर्डी जवळ झाली आहे.
विशेष म्हणजे या महामार्गाचा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू होणार असून या दुसऱ्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर केलं जात आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गाचा दुसरा टप्पा हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याच टार्गेट प्राधिकरणाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.
अर्थातच हा दुसरा टप्पा आगामी लोकसभा अन विधानसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. निश्चितच हा महामार्ग संपूर्णपणे बांधून तयार झाल्यानंतर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा अन जलद होणार असून वाहतुकीचा कालावधी वाचणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाच वर्षांपासून बंद असलेला ‘हा’ पूल ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार, चाकरमान्यांचा प्रवास…
निश्चितच प्रवाशांच्या वाहतुकीच्या वेळेत बचत यामुळे होणार असून इंधनमध्ये देखील बचत होणार आहे. त्यामुळे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलणार असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासात गेम चेंजर सिद्ध होईल आणि यामुळे राज्याच्या कृषी, औद्योगिक, पर्यटन, अध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होईल असा दावा जाणकारही करत आहेत.
दरम्यान, आता या महामार्गाबाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेला समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये तब्बल 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली जावी अशी मागणी देखील आमदार महोदय यांनी केली आहे.
हे पण वाचा :- द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! विकसित झालं द्राक्षाचे नवीन वाण; ‘हे’ आहेत याचे वैशिष्ट्ये
आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गाच्या जालना आणि नांदेड जिल्ह्यातील भूसंपादनामध्ये 1000 कोटीहून अधिकचा घोटाळा झाला आहे. यामध्ये जालना आणि परभणी जिल्ह्यातील काही दलालांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. एवढेच नाही तर या घोटाळ्यात माजी मंत्रीही सहभागी असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे याचा चौकशीसाठी समिती गठीत करण्याची मागणी त्यांच्या वतीने उपस्थित झाली आहे.
अधिवेशनात आमदार महोदय यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी अधिवेशनात समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लीक झाल्याचा आरोप केला आहे. तसेच काही माजी मंत्री आणि दलालांनी महामार्गात जाणाऱ्या जमिनी आधीच कमी किमतीने खरेदी केल्याचा आणि या जमिनी फळबागा म्हणून दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. निश्चितच काँग्रेसच्या या आमदाराच्या आरोपामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाबाबत चर्चा रंगत आहेत. या आरोपामुळे आता नवीन वाद पेटण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, योजनेसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्रे लागणार, वाचा सविस्तर